व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Revati sule marriage : सुप्रिया सुळेंच्या लाडक्या लेकीच्या विवाहसोहळ्याला सुरुवात

Revati sule marriage : सुप्रिया सुळेंच्या लाडक्या लेकीच्या विवाहसोहळ्याला सुरुवात

supriya-sule-daughter-revati-sule-marriage-ceremony-begins-sharad-pawar : शरद पवारांच्या घरात लगीनघाईची धामधूम

Pune : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण असून लग्नसराईची धामधूम सुरू झाली आहे. शरद पवार यांच्या नात आणि सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे विवाहबंधनात अडकत असून विवाहपूर्व विधी आणि कौटुंबिक कार्यक्रमांना उत्साहात सुरुवात झाली आहे. या सोहळ्याचे काही खास फोटो समोर आले असून ते सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत.

रेवती सुळे यांचा विवाह नागपूरमधील प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांचे पुत्र सारंग लखानी यांच्याशी होत आहे. या विवाहसोहळ्याची अधिकृत घोषणा काही महिन्यांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्यानंतर राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात या विवाहाची मोठी चर्चा रंगली होती. आता प्रत्यक्ष विवाह सोहळा होत असल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये लग्न सोहळ्याची धामधूम दिसत आहे.

Pawanraje nimbalkar murder case : पद्मसिंह पाटीलसह सर्व आरोपी निर्दोष, ओमराजे निंबाळकरांना मोठा धक्का

नुकत्याच पार पडलेल्या विवाहपूर्व धार्मिक विधी आणि पूजाविधीचे फोटो समोर आले आहेत. या छायाचित्रांमध्ये रेवती सुळे आणि सारंग लखानी पारंपरिक पिवळ्या रंगाच्या पोशाखात आकर्षक दिसत आहेत. दोघांनीही एकसारख्या रंगसंगतीचे पोशाख परिधान केल्याने त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाचे विशेष आकर्षण वाढले. वधूमाता सुप्रिया सुळे यांनीही पिवळ्या रंगाची साडी परिधान केली. कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हे विधी पार पडले.

रेवती सुळे यांचा त्यांच्या वडिलांसोबतचा भावनिक क्षणही पाहायला मिळत आहे. या फोटोंना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असून अनेकांनी भावी वधू-वरांना शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

NEET exam : NEET परीक्षेतील सावळागोंधळ कायम: नागपूरच्या विद्यार्थ्याला थेट ‘अबू धाबी’चे परीक्षा केंद्र; देशभरात तीव्र संताप

शरद पवार यांच्या राजकीय वारशाशी जोडलेले नाव असतानाही रेवती सुळे या कायमच प्रसिद्धीपासून दूर राहिल्या आहेत. त्यांनी उच्च शिक्षणासाठी परदेशाचा मार्ग निवडला. रेवती यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्र विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले असून त्यानंतर त्यांनी पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले आहे. राजकीयदृष्ट्या प्रभावशाली कुटुंबातील सदस्य असूनही त्यांनी सार्वजनिक आणि राजकीय जीवनापासून दूर राहणे पसंत केले आहे.

दरम्यान, रेवती सुळे यांचे होणारे पती सारंग लखानी हे नागपूरमधील नामांकित उद्योगपती अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. उद्योग क्षेत्रासोबतच क्रीडा क्षेत्रातही त्यांची ओळख आहे. सारंग हे उत्कृष्ट बॅडमिंटनपटू असून व्यावसायिक क्षेत्रातही त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. उपलब्ध माहितीनुसार, ते गेल्या अनेक वर्षांपासून विश्वराज समूहात कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय त्यांनी विविध औद्योगिक आणि व्यावसायिक प्रकल्पांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Rajmata jijau scheme : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला १ रुपयात मिळणार शासकीय जमीन

या विवाहसोहळ्याशी संबंधित आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे नागपूर येथे नियोजित असलेला स्वागत समारंभ पुढे ढकलण्याचा निर्णय. सारंग लखानी यांचे वडील अरुण लखानी यांनी घेतल्याची माहिती यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी दिली होती. देशातील परिस्थिती आणि खर्चात संयम राखण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

राजकीय क्षेत्रातील प्रभावशाली पवार कुटुंब आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिष्ठित लखानी कुटुंब यांचा हा विवाहसोहळा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विवाहपूर्व कार्यक्रमांचे फोटो समोर आल्यानंतर या सोहळ्याबाबतची उत्सुकता आणखी वाढली असून लवकरच पार पडणाऱ्या विवाहाकडे राज्यासह देशभरातील अनेकांचे लक्ष लागले आहे.

___

error: Content is protected !!