व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home क्राईम Sand Mafia : नांदुरा येथे रेतीमाफीयांची मुजोरी, तहसीलदारांवर कॅबीनमध्ये शिरून प्राणघातक हल्ला

Sand Mafia : नांदुरा येथे रेतीमाफीयांची मुजोरी, तहसीलदारांवर कॅबीनमध्ये शिरून प्राणघातक हल्ला

sand mafia attacked tehsildar inside the cabin in a life-threatening assault in Nandura : मारहाण करून जीवे मारण्याची धमकी ; महसूल प्रशासनात खळबळ

Nandura अवैध रेती वाहतुकीवर कारवाई केल्याचा राग मनात धरून रेतीमाफियाने थेट नांदुरा येथील तहसील कार्यालयात घुसून तहसीलदारांवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने महसूल प्रशासनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

२3 एप्रिल रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास तहसीलदार अजितराव जंगम आपल्या कक्षात कामकाजात व्यस्त असताना, आरोपी समाधान भगवान मोरे हा थेट केबिनमध्ये घुसला. मागील बाजूने लोखंडी वस्तूने डोक्यावर प्रहार करत जंगम यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यानंतर आरोपी व त्याच्या साथीदाराने गळा पकडून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली, शर्ट फाडला आणि “तू वाळूच्या गाड्या पकडतोस, तुला जिवंत सोडणार नाही,” अशी उघड धमकी दिली.

Water shortage : आठ महिन्यांपासून पाणीच मिळाले नाही, संतप्त महिलांचा अभियंत्याच्या कक्षात ठिय्या

यावेळी हस्तक्षेप करण्यासाठी धावलेल्या नायब तहसीलदार श्रीशैल व्हट्टे यांनाही आरोपींनी धमकावत मारहाण केली. “तुला पकडतोस काय, पोटात सुरा खुपशीन,” अशा शब्दांत त्यांना धमकी देण्यात आली. या सर्व प्रकारामुळे तहसील कार्यालयात काही काळ भीती व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

ही घटना घडण्यापूर्वी तहसीलदार जंगम यांनी मोताळा रोडवरील नांदुरा बायपासवर रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर (एमएच-२८-एबी-७६३८) वर कारवाई केली होती. संबंधित टिप्पर तहसील कार्यालयात जप्त करून त्यावर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू होती. याच कारवाईचा बदला घेण्यासाठी हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Revenue department : मलकापूर पांग्रा मंडळातील १४ गावांचा एल्गार; साखरखेर्डा समावेशाला विरोध, सिंदखेडराजातच ठेवण्याची मागणी

नायब तहसीलदार श्रीशैल व्हट्टे यांच्या फिर्यादीवरून नांदुरा पोलिसांनी आरोपी समाधान मोरे व त्याच्या साथीदाराविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. महसूल अधिकाऱ्यांवर वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. यापूर्वीही खामगाव येथे तहसीलदार सुनील पाटील यांच्यावर रेती कारवाईदरम्यान वाहन चढवून हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे अवैध वाळू तस्करीविरुद्ध कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

error: Content is protected !!