uddhav-thackeray-vidhan-parishad-election-2026-candidature-maharashtra-politics : ठाकरेंच्या निर्णयावर बिनविरोध निवडणुकीचा ‘राजकीय गेम’
Mumbai: महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुन्हा सभागृहात येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारत निवडणूक आयोग यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील ९ जागांसाठी नियमित निवडणूक आणि एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार असून १२ मे रोजी मतदान आणि त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेतील आमदारकीचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत असून ते पुन्हा निवडणूक लढवणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षातील अनेक नेते ठाकरे यांनी पुन्हा विधान परिषदेत यावे, यासाठी आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. मात्र स्वतः ठाकरे या बाबतीत फारसे इच्छुक नसल्याची चर्चा असून अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे. त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.
Nashik crime news : एकाच दिवशी माजी महापौर, गटनेते आणि माजी नगरसेवकावर गुन्हे दाखल
विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार भाजपला ५, शिवसेना २, राष्ट्रवादी काँग्रेसला १ आणि महाविकास आघाडीला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. महायुतीकडे भाजपचे १३१, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ५७ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ४० असे एकूण संख्याबळ असल्याने त्यांच्या ८ उमेदवारांचे विजय निश्चित मानले जात आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ ४६ असल्याने त्यांना केवळ एकच जागा सहज मिळू शकते, तर दुसऱ्या जागेसाठी अतिरिक्त मतांची गरज भासणार आहे.
महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे येत असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. मात्र ठाकरे निवडणूक लढवण्यास नकार दिल्यास त्यांच्या पक्षाकडून पर्यायी उमेदवार दिला जाऊ शकतो. यामध्ये अंबादास दानवे, सुषमा अंधारे, विनायक राऊत, राजन विचारे, वैभव नाईक आणि सूरज चव्हाण यांची नावे चर्चेत असल्याचे समोर येत आहे.
Ashok kharat case : भोंदूबाबा अशोक खरातवर इडी आणि आयकर विभागाचा सर्जिकल स्ट्राईक
दरम्यान, विधान परिषदेतील उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा कार्यकाळ संपणार आहे. तसेच प्रज्ञा सातव यांच्या जागेसाठी पोटनिवडणूकही होणार आहे. निवडणूक प्रक्रियेची अधिसूचना २३ एप्रिल रोजी जारी होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल आहे. अर्जांची छाननी २ मे रोजी होईल, तर ४ मे ही माघार घेण्याची अंतिम तारीख आहे. १२ मे रोजी मतदान आणि मतमोजणी होऊन १३ मेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर केवळ त्यांच्या राजकीय भवितव्याचा नव्हे, तर विधान परिषद निवडणुकीच्या संपूर्ण समीकरणाचा खेळ अवलंबून असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.








