baramati-by-election-parth-pawar-claim-unopposed-election-controversy : पार्थ पवारांचा मोठा दावा, उन्हात मतदानासाठी मोठे आव्हान
Pune: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना पार्थ पवार यांनी एक मोठा दावा करत निवडणुकीच्या समीकरणांना नवा ट्विस्ट दिला आहे. बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, मात्र काही लोकांनी जाणूनबुजून उमेदवार उभे करून ही निवडणूक लढतीत आणली, असा आरोप त्यांनी केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना पार्थ पवार म्हणाले की, अनेकांची इच्छा होती की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. मात्र तसे घडले नाही. काही प्रतिस्पर्धी उमेदवारांना मुद्दाम उभे करण्यात आले असून त्यामागे वेगवेगळे राजकीय हेतू असल्याचा त्यांनी संकेत दिला. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Amravati Congress : काँग्रेसमध्ये बदलाचे वारे; जिल्हाध्यक्ष-शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची लगबग
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी होणाऱ्या सांगता सभेबाबतही पार्थ पवार यांनी माहिती दिली. सभेच्या तयारीसाठी जोरदार हालचाली सुरू असून राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सभेला देवेंद्र फडणवीस, उदय सामंत, रामदास आठवले आणि सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Balwant Wankhede : ‘मी अर्ज दाखल केला, पण स्पर्धेत नाही’, खासदार वानखडेंचा दावा
पोटनिवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त करताना पार्थ पवार यांनी सांगितले की, पक्ष पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरे जाणार आहे. मात्र, सध्या प्रचंड उष्णतेमुळे मतदारांना मतदानासाठी बाहेर काढणे हे मोठे आव्हान ठरणार आहे. उन्हातही मोठ्या संख्येने मतदान व्हावे यासाठी विशेष नियोजन केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Paratwada sexual exploitation case : बदनामीमुळे पीडित तरुणी शांत होती, आता सगळच सांगितलं!
यावेळी त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवण्याचा निर्धार व्यक्त करत, मागील विक्रम मोडण्याचे लक्ष्य ठेवले असल्याचे सांगितले. बारामतीतील ही पोटनिवडणूक आता केवळ स्थानिक राहिली नसून राज्यासह देशाच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. पार्थ पवारांच्या या वक्तव्यामुळे आगामी राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
___








