व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या Bypoll voting : बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी आज मतदान !

Bypoll voting : बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी आज मतदान !

baramati-rahuri-bypoll-voting-23-april-2026-maharashtra-news-update :3.84 लाखांवर मतदारांचा कौल ठरवणार नवे नेतृत्व

Pune : राज्याचे राजकारण ढवळून काढणाऱ्या बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज 23 एप्रिल रोजी मतदान होत असून एकूण सुमारे 3 लाख 84 हजारांहून अधिक मतदार 478 मतदान केंद्रांवर आपला लोकशाही हक्क बजावणार आहेत. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकांमध्ये मतदारांचा कौल कोणाच्या पारड्यात पडणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

बारामती मतदारसंघात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. मतदानापूर्वी त्या अजित पवार यांच्या विद्या प्रतिष्ठान येथील स्मृतिस्थळाला अभिवादन करून मतदान करणार आहेत. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न झाले होते, मात्र नंतर परिस्थिती बदलली. काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने प्रत्यक्ष लढत कमी तीव्र दिसत असली तरी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघात दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. या ठिकाणी भाजपकडून त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले मैदानात उतरले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्याशी त्यांची थेट लढत होत आहे. या मतदारसंघात एकूण 22 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने निवडणूक अत्यंत चुरशीची होत आहे.

Cabinet decision : कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण, आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना दिलासा; आयटी पार्कसाठी जमीन

राहुरीत एकूण 374 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून सुमारे 3 लाख 33 हजार 543 मतदार नोंदणीकृत आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे 2 हजार 180 अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील नियुक्त करण्यात आला आहे. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांच्यासह अन्य अपक्ष उमेदवारही मैदानात आहेत, ज्यामुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखेरपर्यंत आपली भूमिका स्पष्ट न केल्याने त्यांच्या समर्थकांचा कल कोणत्या उमेदवाराकडे झुकतो, हे या निवडणुकीतील महत्त्वाचे समीकरण ठरणार आहे. त्यामुळे राहुरीतील निकालावर अनेक घटकांचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

Khadse vs wagh : रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ यांच्यात सोशल मीडियावरून पुन्हा शब्दयुद्ध!

दोन्ही मतदारसंघातील मतदान आज पार पडत असून मतमोजणी 4 मे 2026 रोजी होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून या पोटनिवडणुका आगामी राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम करणाऱ्या ठरणार आहेत.

error: Content is protected !!