व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir mungantiwar: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सचिवांची दांडी; विधानसभेत मुनगंटीवार कडाडले, अध्यक्षांचे प्रशासनाला तातडीचे...

Sudhir mungantiwar: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सचिवांची दांडी; विधानसभेत मुनगंटीवार कडाडले, अध्यक्षांचे प्रशासनाला तातडीचे खडे बोल!

Sudhir Mungantiwar slams officials in the Assembly over the absence of secretaries on farmers’ issues : प्रशासनाची उदासीनता आणि उर्मटपणा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, मुनगंटीवार खडसावले

Nagpur विधानसभेत जनतेच्या आणि विशेषतः बळीराजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चर्चा सुरू असताना, संबंधित विभागाच्या उच्चपदस्थ सचिवांनी सभागृहाकडे फिरवलेली पाठ विधानसभेत प्रचंड संतापाचा विषय ठरली. “सभागृहातील प्रत्येक आमदार ३ लाख जनतेचे प्रतिनिधित्व करतो, मग या विधानसभेला काही महत्त्व आहे की नाही? काही सचिव प्रामाणिकपणे सभागृहात उपस्थित राहतात, तर काही जण वारंवार दांडी का मारतात? सरकारकडून मिळणाऱ्या पगारात काही कमी-जास्त फरक आहे का?” अशा जळजळीत आणि थेट शब्दांत भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासकीय मुजोरीवर कडाडून हल्ला चढवला.

लोकप्रतिनिधी लाखो जनतेचे प्रश्न मांडत असताना प्रशासनाची ही उदासीनता आणि उर्मटपणा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असे सांगत त्यांनी हा गंभीर प्रश्न थेट तालिका अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिला.

Mva Meeting : मविआच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी; उद्धव ठाकरे संतप्त

केवळ मंत्रालयात बसून कागदी शासन निर्णय (जीआर) काढल्याने जमिनीवरचे प्रश्न सुटत नाहीत, असा टोला लगावत मुनगंटीवारांनी प्रशासकीय दिरंगाईवर तीव्र शब्दांत बोट ठेवले. लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर संबंधित सचिवांनी स्वतः सभागृहात उपस्थित राहून स्पष्टीकरण देणे आणि निर्णय प्रक्रियेला गती देणे हे त्यांचे घटनात्मक कर्तव्य असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.

मुनगंटीवार यांच्या या रौद्ररुपामुळे सभागृहातील वातावरण कमालीचे तापले आणि संपूर्ण अधिकारी गॅलरीचे धाबे दणाणले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तालिका अध्यक्षांनी तात्काळ हस्तक्षेप करत, “सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अत्यंत गंभीर आहे. संबंधित सर्व सचिव आणि जबाबदार अधिकाऱ्यांनी तात्काळ सभागृहात उपस्थित राहावे, असे आदेश जारी करण्यात येत आहेत,” असे कडक निर्देश सभागृहात दिले.

Sanjay Sawkare : बुलढाण्यात पालकमंत्री सक्रिय, सहपालकमंत्री ‘मिसिंग’?

मुनगंटीवार यांच्या या थेट आणि आक्रमक हस्तक्षेपामुळे नेहमीच एसी केबिनमध्ये बसून निर्णय घेणाऱ्या आयएएस (IAS) लॉबीला मोठा झटका बसला असून, केवळ कागदी घोडे न नाचवता जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आता थेट उत्तर द्यावे लागणार असल्याने विधानभवनाच्या कॉरिडोअरमध्ये याच ‘कडक’ भूमिकेची जोरदार चर्चा रंगली आहे.

error: Content is protected !!