व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Tukaram mundhe : ‘मिस्टर क्लीन’ तुकाराम मुंढेंच्या २१ वर्षांत तब्बल २५ वेळा...

Tukaram mundhe : ‘मिस्टर क्लीन’ तुकाराम मुंढेंच्या २१ वर्षांत तब्बल २५ वेळा बदल्या

tukaram-mundhe-transfer-fda-commissioner-25th-transfer-maharashtra-ias-officer : आता अन्न वऔषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी

Mumbai : आपल्या तडफदार कार्यशैलीमुळे आणि ‘मिस्टर क्लीन’ अशी ओळख निर्माण करणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची राज्य सरकारने पुन्हा बदली केली आहे. दिव्यांग कल्याण विभागात प्रभावी कामगिरी केल्यानंतर आता त्यांची अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून ते नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. विशेष म्हणजे त्यांच्या २१ वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीतील ही तब्बल २५ वी बदली ठरली आहे.

एप्रिल महिन्यात तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागातून मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली होती. मात्र या नियुक्तीवर विविध स्तरांतून आक्षेप नोंदवले गेल्याची चर्चा होती. मदत आणि पुनर्वसन विभागातील विद्यमान सचिव विनिता सिंघल यांनी राजकीय स्तरावर हालचाली करून ही बदली रोखल्याचेही बोलले जात होते. त्यामुळे मुंढे यांच्यासाठी सरकार नव्या जबाबदारीच्या शोधात असल्याची चर्चा प्रशासनात रंगली होती. अखेर आता त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Mahayuti : महायुतीत महामंडळांच्या खुर्च्यांसाठी जोरदार हालचाली

तुकाराम मुंढे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक संवेदनशील आणि महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. कठोर निर्णयक्षमता, पारदर्शक प्रशासन आणि नियमांची कडक अंमलबजावणी यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले. नवी मुंबई, नाशिक आणि नागपूर महानगरपालिकेतील त्यांची कारकीर्द विशेष गाजली होती. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा असो किंवा भ्रष्टाचाराविरोधातील भूमिका, मुंढे यांनी प्रत्येक ठिकाणी वेगळी छाप सोडली.

Sharad pawar : शरद पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं जाहीर कौतुक

दिव्यांग कल्याण विभागात काम करत असतानाही त्यांनी अनेक प्रलंबित प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले होते. प्रशासनातील शिस्त आणि कार्यपद्धतीत बदल घडवून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या अचानक झालेल्या बदलीनंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता अन्न व औषध प्रशासन विभागात त्यांची नियुक्ती झाल्यानंतर औषध नियंत्रण, अन्न सुरक्षा आणि प्रशासनातील पारदर्शकतेबाबत ते कोणते निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राज्य शासनाने इतर काही महत्त्वाच्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याही जाहीर केल्या आहेत. कान्हुराज बगाटे यांची महामुंबई मेट्रो संचालन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीधर दुबे यांच्याकडे मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्य कामगार विमा योजनेचे आयुक्त आर. एस. चव्हाण यांच्याकडे हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तसेच बाबासाहेब बेलदार यांची धुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Chandrashekhar bawankule : विधान परिषदेची रणधुमाळी; ७५ टक्के संख्याबळ, तरीही तडजोडीची तयारी

२००५ मध्ये सोलापूर येथे प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेला सुरुवात करणाऱ्या तुकाराम मुंढे यांनी गेल्या दोन दशकांत राज्यातील विविध महत्त्वाच्या विभागांमध्ये काम केले आहे. वारंवार होणाऱ्या बदल्यांनंतरही आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि कठोर प्रशासनशैलीमुळे त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे आता अन्न व औषध प्रशासन विभागात त्यांच्या नेतृत्वाखाली कोणते बदल होतात, याबाबत प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!