व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या Amruta Fadnavis : नारीशक्तीसाठी मोदी भक्कम, पण ‘लव्ह जिहाद’पासून मुलींनी सावध राहावे;...

Amruta Fadnavis : नारीशक्तीसाठी मोदी भक्कम, पण ‘लव्ह जिहाद’पासून मुलींनी सावध राहावे; अमृता फडणवीस कडाडल्या!

Amruta Fadnavis stresses the need for 33% reservation to ensure equal rights : समान अधिकारांसाठी ३३ टक्के आरक्षण मिळणे आवश्यक असल्याचे मत

Nagpur नारीशक्ती वंदन विधेयक पारित व्हावे ही केवळ महिलांचीच नव्हे, तर समाजातील सर्व स्तरांतील लोकांची इच्छा आहे. स्त्रियांना त्यांचा हक्क मिळायलाच हवा आणि विधानसभा असो वा लोकसभा, प्रत्येक ठिकाणी महिलांचा सक्रिय सहभाग असणे काळाची गरज आहे, अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी महिला आरक्षणाचे जोरदार समर्थन केले. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आरक्षण विधेयकासह ‘लव्ह जिहाद’ आणि ‘कॉर्पोरेट जिहाद’सारख्या गंभीर विषयांवर आपली रोखठोक मते मांडली.

महिला आरक्षणाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, सुरुवातीला महिलांचे प्रतिनिधित्व केवळ चार टक्के होते, जे आता वाढले आहे; मात्र समान अधिकारांसाठी ३३ टक्के आरक्षण मिळणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक मोठे ऐतिहासिक पाऊल उचलत आहेत. विरोधक यात खोडा घालण्याचा किंवा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतील, पण मोदीजी आपल्या निर्णयावर भक्कम आहेत आणि त्यांच्या मागे देशातील स्त्री-शक्ती उभी आहे. या विधेयकामागे कोणताही स्वार्थ नसून केवळ महिलांचे भले व्हावे हाच उद्देश असल्याने हे विधेयक विनाअडथळा पास व्हायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Nagpur congress conflicts : काँग्रेसचा ‘हात’ पुन्हा वादात! स्वीकृत सदस्यावरून ठाकरे-राऊत गट भिडले; प्रदेशाध्यक्षांच्या ‘त्या’ पत्रावरून सस्पेन्स वाढला

यावेळी अमृता फडणवीस यांनी ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि महिलांच्या शोषणावरही भाष्य केले. त्या म्हणाल्या, मी जेव्हा ॲक्सिस बँकेत कार्यरत होते, तेव्हा माझ्यासमोर अशा काही केसेस आल्या होत्या. त्यावेळी आम्ही ‘विसल ब्लोइंग’ करून संबंधित दोषी मुलांविरुद्ध कडक कारवाई केली होती. महिलांनी अशा प्रकारांविरुद्ध आवाज उठवणे आणि वरिष्ठांकडे तक्रार करणे गरजेचे आहे. तसेच, सध्या समोर येत असलेली ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे अत्यंत भयानक असल्याचे सांगत त्यांनी मुलींना अलर्ट राहण्याचे आवाहन केले. जर आपण आपली संस्कृती, भारतीय मूल्ये आणि संस्कारांचे पालन केले, तर मुली अशा संकटात सापडणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Nagpur congress : जिचकारांचे नाव पुढे करताच काँग्रेसचा एमआयएमला ‘दे धक्का’; आसीनगर झोन सभापती निवडणुकीत केला गेम

खरात प्रकरणावर बोलताना त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. खरातने आपल्या बुद्धीचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी केला आणि महिला त्याच्या बळी पडल्या याचे दुःख वाटते, असे सांगत त्यांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या दाव्याबाबत विचारले असता, सध्या मला त्या प्रकरणाची पूर्ण माहिती नाही, मी माहिती घेऊनच त्यावर भाष्य करेन, असे म्हणत त्यांनी अधिक बोलणे टाळले. एकूणच, महिला सुरक्षा आणि अधिकार या मुद्द्यांवर अमृता फडणवीस यांनी आज प्रशासकीय आणि सामाजिक स्तरावर कडक भूमिकेची गरज प्रतिपादन केली.

error: Content is protected !!