Dr. Vilas dangre was one of the trusted doctors of Vajpayee and Advani : पद्मश्री डॉ. विलास डांगरे यांचा अचंबित करणारा प्रवास
Nagpur केवळ नागपूरच नव्हे तर मध्य भारतात सुप्रसिद्ध असलेले होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. विलास डांगरे यांना यंदा वैद्यकीय क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आहे. २५ जानेवारी २०२५ रोजी जाहीर झालेला हा पुरस्कार त्यांच्या मानवतावादी कार्याची दखल घेत देण्यात आला आहे.
वयाच्या ७१व्या वर्षीही डॉ. डांगरे रुग्णसेवा देत आपल्या असामान्य कौशल्याने आणि दयाळूपणाने हजारो लोकांचे आयुष्य सुखावून प्रेरणा देत आहेत. दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, गानकोकिळा लता मंगेशकर, बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या अनेक दिग्गजांनीही डॉ. डांगरे यांच्यावर विश्वास ठेवून उपचार घेतले आहेत. राजकारणात जाण्याची संधी असतानादेखील केवळ सेवाकार्यावरच भर देणाऱ्या डांगरे यांची सेवाव्रती अशीच ओळख आहे.
Ex-Minister Sudhir Mungantiwar : मुल येथील Government Politechnic साठी सरकारचे पाऊल पडते पुढे
१९५४ साली अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार या छोट्या गावात जन्मलेल्या डॉ. डांगरे यांची कहाणी कठोर परिश्रम, शिस्त आणि दयाळूपणाने भरलेली आहे. नवयुग शाळेतून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी १९७६ साली नागपूर होमिओपॅथिक कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय क्षेत्राला समाजसेवेच्या माध्यमातून प्रतिष्ठा मिळवून दिली. आरएसएसचे स्वयंसेवक आणि आध्यात्मिक विचारसरणीचे अनुयायी असलेल्या डॉ. डांगरे यांनी आयुष्यभर सामाजिक कार्याला प्राधान्य दिले.
त्यांनी नागपुरातील सुरेंद्रनगर येथे स्वत:चे क्लिनिक सुरू केले आणि गेल्या पन्नास वर्षांत लाखो रुग्णांना बरे केले. त्यांचे रुग्ण हे केवळ विदर्भातीलच नाही, तर देशभरातील विविध राज्यांतून येतात.
औषधी देताच आवाज बरा झाला
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी नागपुरात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाजाने साथ सोडली होती. कस्तूरचंद पार्क येथील सभेनंतर त्यांच्या आवाजावर परिणाम झाल्याने ब्रह्मपुरी येथील पुढील सभेबाबत साशंकता निर्माण झाली.
मात्र, डॉ. डांगरे यांच्या होमिओपॅथी औषधामुळे त्यांचा आवाज त्वरित सुधारला. नितीन गडकरी यांच्या आश्वासनानंतर मोदींनी हे औषध घेतले आणि काही मिनिटांत त्यांना बरे वाटले. औषधाच्या या प्रभावाने प्रभावित होऊन मोदींनी हेच औषध अहमदाबादला मागवले होते. नाडी तपासून आजार ओळखणारे डॉक्टर अशी त्यांची ख्याती आहे. अनेक ॲलोपॅथिक डॉक्टर शेवटचा उपचार म्हणून त्यांच्याकडे पाठवतात. शेवटची आशा म्हणूनही डॉ. डांगरेकडे पाहिले जाते. त्यांनी कधीच गरीब आणि श्रीमंत रुग्णांमध्ये भेदभाव केला नाही. डॉ. डांगरे यांचे जीवन हे सेवा आणि साधेपणाचा आदर्श आहे. त्यांनी कधीही पैसा किंवा ऐषआरामासाठी वैद्यकीय व्यवसाय केला नाही.
Ex-Minister Vasant Purake: केंद्रातील भाजप सरकारकडून संवैधानिक संस्थांवर हस्तक्षेप
आपल्या उत्पन्नाचा मोठा भाग त्यांनी सामाजिक कार्यांसाठी दान केला आहे. पाच वर्षांपूर्वी मेंदूच्या आजारामुळे त्यांची दृष्टी कमी झाली, मात्र त्यांनी हार मानली नाही. त्यांनी रुग्णसेवा सुरूच ठेवली आहे. आजही दररोज २५०-३०० रुग्ण तपासतात. त्यांची आत्मशक्ती आणि सेवाभाव आजही प्रेरणादायी आहे.