Breaking

Local Body Elections : निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच बाशिंग बांधून तयार !

Vigorous preparation of aspirants for Local Body elections : इच्छुकांकडून तयारी; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रतिक्षा

Washim Elections लाेकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा सरकारला अद्याप मुहुर्त सापडलेला नाही. दुसरीकडे इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरू केल्याचे चित्र वाशिम जिल्ह्यात आहे. आता या निवडणुका कधी हाेतात, याची प्रतीक्षा राजकीय पक्षांसह इच्छुकांना लागली आहे.

वाशिम जिल्हा परिषद तसेच जिल्ह्यात येत असलेल्या सहा पंचायत समितीचा कार्यकाळ जानेवारी महिन्यात संपणार आहे. कार्यकाळ संपल्यानंतर जिल्हा परिषदवर प्रशासक नियुक्त होणार का? की विद्यमान सदस्य व पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळणार? याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. तरी न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत.

Fake appointment letters Scam : नोकरीच्या नावावर लुबाडणाऱ्या टोळ्या सक्रीय

त्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद यांचा समावेश आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीचा कार्यकाळ संपेल. त्यानंतर त्यांच्या निवडणुका होणारच आहेत. मात्र याबरोबर जिल्ह्यात असलेल्या वाशिम, कारंजा, मंगरूळपीर, रिसोड ह्या नगरपरिषदांचादेखील कार्यकाळ संपलेला आहे. तसेच मालेगाव नगरपंचायतवरदेखील प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती, चार नगरपालिका व एक नगरपंचायत यांच्या निवडणुका होणार आहेत.

जिल्हा परिषद, पंचायत समितीचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या निवडणुका होणारच. मात्र याबरोबर जिल्ह्यात असलेल्या वाशिम, कारंजा, मंगरूळपीर, रिसोड ह्या नगरपरिषदांचा देखील कार्यकाळ संपलेला आहे. तसेच मालेगाव नगरपंचायतवर देखील प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती, चार नगरपालिका व एक नगरपंचायत यांच्या निवडणुका होणार आहेत.

Nagpur Zilla Parishad : फक्त व्याजातून मिळाले सव्वासात कोटी!

वर्चस्वसाठी स्पर्धा

नेतेमंडळी कामाला लागली आहेत. जिल्हा परिषदेमध्ये ५२ सदस्यांपैकी जास्तीत जास्त सदस्य आपल्या गटाचे निवडून यावेत. या दृष्टीने आतापासून तयारी सुरू केली आहे. त्याचसोबत पंचायत समिती आपल्या ताब्यात असावी. यासाठी देखील काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, सेना, मनसे, वंचित, रिपाई गट कामाला लागले आहेत. वाशिम जिल्हा परिषद मध्ये एकूण ५२ सदस्य आहेत. बहुमतासाठी २७ सदस्यांची गरज आहे. आतापर्यंत जिल्हा परिषद वर जास्त वेळ काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता होती.