Breaking

MLA Sanjay Gaikwad : आमदार धावले पत्रकारांसाठी!

Insurance ‘cover’ for journalists : पत्रकारांना विम्याचे ‘कवच’; 10 लाखांचा विमा उतरवणार

Buldhana पत्रकारांच्या बातम्यांमुळे राजकीय पुढारी कधी नाराज होतात, कधी सुखावतात. कधीकधी बातम्या वाचून अगदी वैतागून जाण्याचे प्रसंगही राजकारण्यांवर येतात. पण तरीही राजकीय पुढाऱ्यांनी अडचणीच्या काळात पत्रकारांच्या पाठिशी उभं राहून आदर्श निर्माण केला आहे. त्यानंतरही आपल्या चुका पत्रकार झाकतील, याची शाश्वती त्यांना नसते. मात्र, याचा विचार न करता सदैव आपल्या विधानांमधून वादात राहणारे आमदार संजय गायकवाड यांनी महत्त्वाचं पाऊल उचलंल आहे. त्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

समाजाचे आरोग्य सांभाळणारा पत्रकार हा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो. समाज हिताची काळजी घेणाऱ्या पत्रकाराची काळजी घेतली जावी, त्याला जीवन सुरक्षा प्रदान व्हावी, या उदात्त हेतूने बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकारांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

Mahayuti Government : वर्षभरात ३७५ शेतकऱ्यांनी संपविले जीवन!

शुक्रवार, दि. 10 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता बुलढाणा जिल्हा पत्रकार भवन या ठिकाणी आयोजित विम्याच्या मेगा कॅम्पमध्ये पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून करण्यात आले आहे.

मराठी पत्रकार परिषद संलग्नित बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून 06 जानेवारी मराठी पत्रकार दिनी पत्रकारांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 50 पेक्षा अधिक पत्रकारांनी सहकुटुंब आरोग्य तपासणी करीत शिबिराचा लाभ घेतला होता. त्याचवेळी पत्रकारांना विम्याची संरक्षण असावे, असा एक सूर पत्रकारांमधून उमटला होता. पत्रकारांच्या या आवाहनाला आमदार संजय गायकवाड यांनी पहिला प्रतिसाद दिला आहे.

Dr. Pankaj Bhoyar : राज्यमंत्र्यांनी दिव्यांगांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य

पत्रकाराला विमा संरक्षणाची हमी दिली आहे. बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाची विनंती मान्य करीत आमदार गायकवाड यांनी भारतीय डाक विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 10 लाख रुपयांच्या अपघाती विम्याची पत्रकारांसाठी तरतूद केली आहे. पत्रकार बांधवांनी 10 जानेवारीला सकाळी दहा वाजता बुलढाणा जिल्हा पत्रकार भवन या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे.

या संदर्भात अधिक माहितीसाठी 9850377344, 9890936322, 9422266345, 9922359674 यापैकी कुठल्याही क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. विमा संरक्षणासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे, असे कळविण्यात आले आहे.