Not only Mumbai but also Nagpur is unsafe for women : राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षेचा मुद्दा गंभीर
महाराष्ट्रात महिला व जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा अलीकडे खूपच गंभीर झाला आहे. यावर्षी राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. राज्यातील प्रमुख पाच शहरात जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत २३२९ बलात्काराच्या घटना घडल्याचे पोलिसांच्या वार्षिक आकडेवारीतून समोर आले आहे. मुंबईच नव्हे तर नागपूरही महिलांसाठी असुरक्षित असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
मुंबई शहरात या वर्षात सर्वाधिक ९५८ मुली-तरुणी आणि महिलांवर बलात्कार झाल्याच्या घटना नोंदल्या गेल्या. गेल्या वर्षी मुंबईत ८७८ बलात्काराची नोंद होती. तर यावर्षी हा आकडा वाढला आहे. विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्येही मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. पुणे शहर दुसऱ्या स्थानावर असून, पुण्यात ४३९ महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या. पुण्यात ६१३ विनयभंगाच्या घटनांची नोंद देखील झाली आहे.
Gondia Zilla Parishad Elections : काय असेल सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ?
ठाणे शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे. याठिकाणी ३९७ बलात्काराच्या गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे शहर असलेल्या नागपुरात बलात्काराच्या २९७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. नागपूरमध्ये विनयभंगाच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. तरुणी व महिलांशी अश्लील चाळे केल्याच्या ४९९ गुन्ह्यांची नोंद आहे.
कौटुंबिक हिंसा वाढली
महिला सुरक्षेबाबत पोलीस गंभीर नसल्याचे या आकडेवारीतून दिसून येत आहे. केवळ बलात्काराच्या घटनांबरोबरच, कौटुंबिक हिंसादेखील वाढली आहे. विवाहित महिलांना सासरच्या कुटुंबातीलच दीर, भासरा, सासरा, भाऊजीसह अन्य नातेवाईकांकडून लैंगिक अत्याचाराला बळी पडावे लागले आहे. लग्नापूर्वीच प्रियकर किंवा मित्रांनीसुद्धा विवाहितेचे लैंगिक शोषण केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
Amravati Municipal Corporation मालमत्ता करापोटी भरलेले ३१ लाख फस्त!
आरोपींमध्ये ओळखीच्या व्यक्तींचा समावेश
आरोपींमध्ये सर्वाधिक प्रियकर, नातेवाईक, पती, मित्र आणि ओळखीच्याच व्यक्तींचा समावेश आहे. हे आकडे दर्शवतात की महिला सुरक्षेला प्राधान्य देण्याचा दावा सरकारने केला आहे. तरीही राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.