All departments of district administration under one roof : नव्या इमारतीचे बांधकाम लवकरच; विस्तारीत नागपूरसाठी फायरस्टेशन
Nagpur ‘हा विभाग इकडे आहे, तो विभाग तिकडे आहे. त्या बिल्डींगमध्ये जा, इकडे काम होणार नाही,’ अशी वाक्य ऐकून आता लोक कंटाळले आहेत. याचीच जाणीव ठेवून आता जिल्हा प्रशासनाचे सर्व विभाग एका छताखाली, एकाच इमारतीत येणार आहेत. या नवीन इमारतीचे काम लवकरच सुरू होणार आहे.
CM Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजनही केले. ही नवी इमारत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच होणार आहे, हे विशेष. यासोबतच नागपूरला आता अनेक नव्या प्रकल्पांचीही लॉटरी लागली आहे.
District bank: आता अमरावती जिल्हा बँकेतही कर्ज वाटपात गैरव्यवहार
२०२४ किंवा त्यापूर्वी सुरू झालेले विविध प्रकल्प यावर्षी पूर्णत्वास येतील. त्यांचे लोकार्पण होईल, असा विश्वास शासन व प्रशासनाला आहे. २०२५ या वर्षी वाहतुकीचा ताण कमी करणारे उड्डाणपूल, आरयूबी यासह विस्तारित शहराची गरज भागविणारे फायर स्टेशनचे कामदेखील पूर्ण होणार आहे. याचबरोबर पायाभूत सुविधांच्या इतर अनेक प्रकल्पांच्या कामांना सुरुवात याच वर्षी होणार आहे.
अंबाझरी तलावाच्या सांडव्यावरील दुसऱ्या बाजूला असलेला पूल तोडून त्याठिकाणी दुसरा पूल तयार करण्यात आला आहे. वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी एक बाजू खुली करण्यात आली. सिमेंटीकरणाचे काम सुरू असून ३१ जानेवारीला दोन्ही बाजू वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार आहेत. गुरुद्वारा ते ऑर्डनन्स फॅक्टरीचे पहिले प्रवेशद्वार (वाडी) या उड्डाणपुलाचे लोकार्पण ऑक्टोबर २०२४ मध्ये करण्यात आले. चारपदरी असणाऱ्या या मार्गाची लांबी १.८ किलोमिटर आहे. आरटीओ ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ या २.९ किलोमीटर मार्गाचे काम सुरू आहे. मार्च २०२५ मध्ये दुसरा उड्डाणपूलही खुला होणार आहे.
Kite flying nylon manja : प्रशासनाची एक चूक आणि तरुणाचा गेला जीव
वर्धा मार्गावरून मनीषनगरकडे जाणारी वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी सोमलवाडा आरयूबी तयार करण्यात आला आहे. केवळ आता सर्विस रोडचे काम बाकी आहे. लवकरच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल. नागपूरचा वाढता विस्तार लक्षात घेता अग्निशमन विभागाची महापालिकेची यंत्रणा अपुरी पडत आहे. ही अडचण दूर व्हावी यासाठी मेट्रो रिजन परिसरातील जामठा येथे स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा उभी करण्यात आली आहे. जामठा येथे नवे फायर स्टेशन उभे करण्यात आले आहे.