Vidarbha needs orange processing industries : वनस्पती आरोग्य व्यवस्थापनावर राष्ट्रीय परिषद
Nagpur संत्रा ही नागपूरची ओळख आहे. संपूर्ण देशात ‘ऑरेंज सिटी’ अशी नागपूरची ओळख आहे. त्यामुळे येथील ऑरेंज बर्फी देशात जावी, यासाठी मी खूप आग्रही आहे. नागपुरात होत असलेल्या मदर डेअरीच्या मेगा मॅन्युफॅक्चरिंग प्लान्टच्या माध्यमातून हा उद्देश पूर्ण होईल. अशाप्रकारच्या व्हॅल्यू एडिशन्स खूप महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी संत्रा प्रक्रिया उद्योग निर्माण होणे गरजेचे आहे. विदर्भातील संत्रा उत्पादकांना सक्षम करण्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये वनस्पती आरोग्य व्यवस्थापनावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. इंडियन फायटोपॅथॉलॉजिकल सोसायटी आणि केंद्रीय लिंबुवर्गीय संशोधन संस्थान (सीआयसीआर) यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर आयसीएआरचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक, एसआरबीचे माजी अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी यांची प्रमुख उपस्थिती होती.
Local Body Elections : पंचायत समिती सभापतीची निवड दृष्टीपथात!
गडकरी म्हणाले, ‘ऑरेंज सिटीच्या नात्याने नागपुरात ही परिषद जास्त महत्त्वाची आहे. विदर्भातील कृक्षी क्षेत्र अनेक समस्यांचा सामना करत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्नही भेडसावत आहे. अशात परिस्थिती बदलण्याचे मोठे आव्हान आपल्यापुढे आहे. त्यासाठी आम्ही विविध प्रकल्पांवर काम करतोय. कृषी क्षेत्राला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करतोय.’
Nagpur Municipal Corporation : तक्रार निवारण करण्यात मनपाला ‘फाईव्हस्टार रेटिंग’
ते म्हणाले, ‘कापूस, संत्रा ही विदर्भाची मुख्य पिके आहेत. प्रत्येक क्षेत्रात, विशेषतः उद्योग क्षेत्रात तंत्रज्ञान, बाजारपेठ महत्त्वाचे असते. स्पेनमध्ये ऑरेंज ऑर्कीड आहे. याठिकाणी एका एकराला ३० टन संत्र्याचे उत्पादन आहे. तर आपल्याकडे एकरी १२ ते १५ टन उत्पादन आहे. त्यात गुणवत्ता सुधारण्याचीही गरज आहे. त्यादृष्टीने आयसीएआर चांगले काम करत आहे. ऑरेंज ऑर्किड विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’
आयसीएआरने वेगवेगळ्या संस्थांच्या नर्सरी सोबत घेण्याची गरज आहे. त्यासाठी प्लान्ट पॅथॉलॉजी स्थापन होण्याची गरज आहे. रोगविरहित कलमांची, झाडांची आवश्यकता आहे. प्रतिबंधात्मक उपाय करण्याची गरज आहे, याचाही गडकरींनी आवर्जून उल्लेख केला.