A development plan will be prepared after identifying the areas of strength in the Nagpur district : पर्यटकांच्या सोयीसुविधांचा होणार विचार
Nagpur प्रत्येक जिल्ह्यामध्ये ठराविक शक्तीस्थळे आहेत. यात नैसर्गिक साधनसंपत्तीसह औद्योगिक प्रगतीच्या दृष्टीने, पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने, कृषी क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनाच्या दृष्टीने एक समृध्द वारसा आपल्याकडे आहे. जिल्ह्यातील नेमक्या शक्तीस्थळांना ओळखून समग्र विकासासाठी कोणते नियोजन अधिक हितकारक ठरेल त्यादृष्टीने भविष्यातील विकास आराखड्याचे नियोजन करा, असे निर्देश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले आहेत.
विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी जिल्हा विकास आराखडा व नियोजनाबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. कोणत्याही विकास कामांना एक कालमर्यादा असते. ही कामे दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण झाली, तरच त्यातील उपयोगिता हाती लागते. नियोजनाप्रमाणे वेळेत काम पूर्ण करतांना त्यात गुणवत्ता असली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत त्यांनी शहरातील स्वच्छता व सुशोभिकरणाकडे लक्ष वेधले. विविध स्मारक, पर्यटन स्थळ, बसस्टॉप, मेट्रो स्टेशन येथील स्वच्छता ही आपल्या दूरदृष्टीत, नियोजनात असायलाच हवी. अनेक ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांना बसण्याची सोय नसते. सावलीच्या जागा लोक शोधत असतात. आपण जेवढ्या चांगल्या सुविधा देऊ तेवढ्या प्रमाणात पर्यटक वाढतील. यातून रोजगार वाढेल हे लक्ष्यात ठेऊन नियोजनावर भर द्या, अशा सूचना त्यांनी दिल्या.
Robbed at gunpoint : बंदुकीच्या धाकावर लुटले; सव्वा दोन लाखांचे दागिने पळविले
नागपूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळासह अनेक सुविधा उपलब्ध आहेत. मिहानअंतर्गत अनेक विकास प्रकल्प राबविले जात आहेत. अनेक प्रकारच्या नवीन इंडस्ट्रीज येथे येत आहेत. कंपन्यांना लागणारे कुशल मनुष्यबळ स्थानिक पातळीवरच कसे उपलब्ध होईल, यासाठी विविध शिक्षणसंस्थांसमवेत करार करुन नवे अभ्यासक्रम शिकविणाऱ्या इंस्टीटयुट आकारास येतील, अशी दूरदृष्टी आपल्या नियोजनात ठेवा. याचबरोबर विविध उद्योजकांना प्रशासनातर्फे तत्काळ सहकार्य झाले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.