BJP people came to us to ask for tickets : नाना पटोलेंच्या दव्याने महायुतीमध्ये खळबळ
Nagpur विधानसभा निवडणूकीत एकतर्फी पराभव झाल्यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात पक्षातच नाराजीचा सूर आहे. अशा स्थितीत नाना यांनी वेगळाच दावा केला आहे. विधानसभेत उमेदवारीसाठी काँग्रेसकडे सर्वांत जास्त अर्ज आले होते. भाजपचे लोकही तिकीट मागायला आमच्याकडे आले होते, असा दावा पटोले यांनी केला आहे.
हा दावा खरा असेल तर भाजपचे नेते याची गंभीरतेने दखल घेतील का असा सवाल उपस्थित होत आहे. पटोले नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी एकला चलोची भूमिका सांगितली. आम्ही त्यांचे स्वागत केले. यावर शरद पवार यांनीही भूमिका मांडली आहे. मुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील का, हा प्रश्न आहे. आधी निवडणूक लागू द्या मग आम्ही कसं लढायचे ते ठरवू, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.
Guardian minister Babasaheb Patil : जिल्ह्याचा विकास निधी ठरलेल्या वेळेत खर्च करा !
विधानसभा निवडणुकीत मतदानानंतर जारी झालेली आकडेवारी व मतदानाच्या दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाने आकडेवारी दिली. यामध्ये तब्बल ६० लाख मतांची तफावत आहे. ही वाढीव मते कुठून आली याचे निवडणूक आयोगाने अद्याप उत्तर दिलेले नाही. आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो तर चंद्रशेखर बावनकुळे यांना का त्रास होतो, असा सवाल नाना पटोले यांनी केला.
सरकार सांगते की बांगलादेशी मतदारांनी फायदा घेतला, तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने बांगलादेशी मतदारांना भारतात आणले का, असा सवाल पटोले यांनी केला. नागपूरच्या अधिवेशनात यावर प्रश्न निर्माण झाला तेव्हा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक आयोगाची वकिली करत होते, अशी टीका पटोले यांनी केली.