Every school in the district will be digitized : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांची माहिती
Nagpur शालेय विद्यार्थ्यांना बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षणाची संधी उपलब्ध झाली पाहिजे. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळा डिजिटल केल्यास ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाबद्दलची रुची अधिक वाढेल. अनेक अवघड बाबी त्यांना सोप्या करुन शिकविता येतील. यादृष्टीने शासनाच्या शाळांच्या वर्गखोल्या डिजिटल करण्यासाठी ग्रामीण भागाला 10 कोटी व शहरी भागासाठी 10 कोटी रुपये पुढील आर्थिक वर्षासाठी राखून ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत झाली. यावेळी वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, विकास ठाकरे, प्रवीण दटके, समीर मेघे, परिणय फुके, अभिजित वंजारी, संजय मेश्राम, चरणसिंग ठाकुर आदींची उपस्थिती होती.
शासकीय योजनांसाठी लागणारा पैसा सामान्य जनतेने दिलेल्या कराच्या माध्यमातून गोळा होतो. समाजातील प्रत्येक घटकाला आपला विकास व्हावा, अशी साधी अपेक्षा असते. या अपेक्षांनुसार मंजूर कामांना पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणांवर आहे. प्रत्येक विभाग प्रमुखाने आपल्या जबाबदारीला ओळखून पारदर्शी कामांप्रती कटीबद्ध व्हावे. गुणवत्तापूर्ण कामे करावे, असे निर्देश बावनकुळे यांनी दिले.
जिल्ह्यातील जलजीवनाच्या कामाबाबत अनेक तक्रारी आहेत. लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही धोरण ठरवितो. लोकांनी ज्या मागण्या केलेल्या असतात त्या मागण्यानुसार विविध योजना शासन उपलब्ध करते. यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने पुरेसा निधी उपलब्ध करुन देतो. मागण्यांची गरज ओळखून त्याची पूर्तता करणे अपेक्षित आहे. मात्र तसे होत नाही याबद्दल बावनकुळे यांनी संताप व्यक्त केला.
MLA Siddharth Kharat : शेतकऱ्यांना खासगी फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करा
नागपूर महानगरात रोजगाराला चालना देणारी अनेक उद्याने बंद अवस्थेत आहेत. अंबाझरी व इतर उद्यानाबाबत जे काही वाद असतील. अथवा जो काही भाग न्यायप्रविष्ठ असेल तेवढा वगळून नागरिकांना त्यांच्या हक्काच्या असलेल्या उद्यानाचा वापर करता आला पाहिजे. त्यांना यात पायी फिरण्यासाठी सुविध उपलब्ध होईल, असे सांगून पालकमंत्र्यांनी अंबाझरी तलाव उद्यानासह इतर उद्यान खुले करण्यास सांगितले.