Threat of ground water pollution in Akola district as well : 69 पाण्याच्या नमुन्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण धोकादायक स्तरावर
Akola जिल्ह्यातील अकोला, मूर्तिजापूर आणि तेल्हारा तालुक्यांतील भूजलात आरोग्यासाठी घातक असलेल्या नायट्रेटचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक आढळले आहे. केंद्र सरकारच्या भूजल गुणवत्ता सर्वेक्षण अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
१ एप्रिल २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत जिल्ह्यात ८२५ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी ६९ नमुन्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण धोकादायक पातळीवर असल्याचे निष्पन्न झाले आहे.
नायट्रेट प्रदूषणाचे आरोग्यावर परिणाम
जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि भारतीय मानक ब्यूरो (BIS) यांच्या मते पिण्याच्या पाण्यातील नायट्रेट मर्यादा ४५ मिलिग्रॅम प्रति लिटरपर्यंत असावी. मात्र, अकोला जिल्ह्यातील अनेक गावांत हे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नायट्रेटचा धोका
पोटाचा कर्करोग
जन्मजात व्यंग व न्यूरल ट्यूब दोष
ब्ल्यू बेबी सिंड्रोम (लहान मुलांमध्ये रक्तातील ऑक्सिजन कमी होणे)
गिलियन बॅरी सिंड्रोम (GBS) सारखे न्यूरोलॉजिकल आजार
Dr. Pankaj Bhoyar : शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावा
उपाययोजना
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी जलस्त्रोतांची नियमित तपासणी करण्याचे आवाहन केले आहे. दूषित पाणी पिण्याच्या दुष्परिणामांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी फिल्टर केलेले किंवा उकळलेले पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
१ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत एकूण ८२५ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६९ नमुने नायट्रेटने दूषित आढळले.
अकोला – १७३ नमुने तपासले, त्यापैकी ४३ दूषित, २२ गावांमध्ये नायट्रेट प्रदूषण.
तेल्हारा – १०२ नमुने तपासले, त्यापैकी १५ दूषित, १० गावांमध्ये नायट्रेट प्रदूषण.
मूर्तिजापूर – १४४ नमुने तपासले, त्यापैकी ११ दूषित, ७ गावांमध्ये नायट्रेट प्रदूषण.
अकोट तालुका – ११४ नमुने तपासले, सर्वच स्वच्छ आढळले.
बार्शीटाकळी तालुका – ११६ नमुने तपासले, कोणतेही दूषित नाहीत.
बालापूर तालुका – ८७ नमुने तपासले, सर्वच स्वच्छ आढळले.
एकूण जिल्हा – ८२५ नमुने तपासले, त्यापैकी ६९ दूषित, ३९ गावांमध्ये नायट्रेट प्रदूषण