Breaking

Dada Bhuse : पालकमंत्रिपदाबाबत दादा भुसेंचा मोठा दावा!

 

Chances of decision regarding Nashik-Raigarh : नाशिक-रायगडबाबत निर्णय येण्याची शक्यता

Nagpur  नाशिक व रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. या मुद्द्यावर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी भाष्य केले आहे. लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक पक्षाला तालुका, जिल्हा स्तरावर वाढवण्याचा अधिकार आहे. जनतेचे प्रश्न सुटत असेल तर पालकमंत्रीपदावरील दावा असणे सोडणे हा विषय नाही. त्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी विविध विषयांवर भूमिका मांडली. संजय राऊत जे बोलले त्यांना ठाण्याच्या रुग्णालयात दाढीवाल्या(शिंदे) डॉक्टरला दाखवावे लागेल. दररोज काहीतरी विचित्र बोलतात आणि चर्चेसाठी विषय देण्याच काम ते करतात. त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा चिमटा त्यांनी काढला.

Chhagan Bhujabal : महाराष्ट्र शासनालाही नाशीक कुंभमेळ्यासाठी मिळवता येतील ७,५०० कोटी !

लोकशाहीत कुणी कुठे रहावे, जावे हा त्याचा व्यक्तिगत अधिकार आहे. छगन भुजबळ यांनाही तो अधिकार आहे. कोणाला प्रवेश द्यावा हा त्या पक्षाचा अधिकार आहे, असेही दादा भुसे यांनी स्पष्ट केले. नागपूर भेटीदरम्यान त्यांनी शिक्षण विभागाचा आढावा घेतला. कळमेश्वर नगरपालिका, जिल्हा परिषद उबाळी शाळा आणि नागपूर मनपाच्या हिंदी शाळेला त्यांनी भेट दिली. शैक्षणिक बाबींवरदेखील ते बोलले.

Nana Patole : आश्वासन तर दिले, पण सोयाबीनला ६ हजारांचा भाव केव्हा देणार ?

राष्ट्रीय शिक्षण धोरण ठरवताना, काही ठिकाणी शाळा बंद होत आहेत. इंग्रजी माध्यमांशी स्पर्धा करताना शाळा, विद्यार्थी टिकले पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर कामकाज सुरू आहे. शिक्षक संघटनांशी यासंदर्भात विचारमंथन झाले. विभागवार आढावा बैठक झाली. आणखी काय करण्याची गरज आहे याचा आढावा घेत आहोत. अंशत: अनुदानाबाबत शासननिर्णय झाला आहे. निधी उपलब्ध होऊ शकला नाही. बजेटमध्ये मागणी करू. शिक्षक नियुक्तीबाबत ज्यांची परीक्षा झाली त्यांना नियुक्त करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. धनंजय मुंडे यांच्या वादावर मात्र त्यांनी मौन बाळगले.