Breaking

Illegal sand mining : धामणा नदीच्या पुलाखाली फेकला मृतदेह!

The body was thrown under the bridge of Dhamana river : अवैध रेती उत्खन; वादाने घेतला युवकाचा बळी

Buldhana बुलढाणा तालुक्यातील ईरला गावाजवळ धामणा नदीच्या पात्रात अवैध रेती उपसा आणि वाहतुकीच्या वादातून एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना ६ फेब्रुवारी राेजी घडली. या प्रकरणाचा छडा लावत धाड पाेलिसांनी ८ फेब्रुवारी राेजी दाेघांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

धाडपासून १२ किमी अंतरावर असलेल्या ईरला गावालगत ६ फेब्रुवारी राेजी पुलाखाली युवकाचा मृतदेह आढळला हाेता. पाेलिसांनी केलेल्या तपासात हा युवक बाेरगाव फदाट या गावातील उमेश साहेबराव फदाट असल्याचे समाेर आले हाेते. पाेलिसांनी या प्रकरणी अकस्मिक मृत्यूंची नाेंद करून तपास सुरू केला हाेता.

Maharashtra Government : समृद्धी महामार्गावर एकाच रात्री तीन अपघात!

मृतक बोरगावातील अंबादास कोलते यांच्या टिप्परवर काम करत होता. रेती वाहतुकीच्या व्यवसायात असलेल्या उमेश फदाट याचा गावातील वैभव ज्ञानेश्वर भोपळे आणि पवन ज्ञानेश्वर बकाल या दोघांशी वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. आरोपींनी जेसीबी मशीनमधील लोखंडी रॉड काढून उमेशच्या डोक्यात जबर मारले. ज्यामुळे तो जागीच ठार झाला.

हत्या केल्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने रक्ताचे थारोळे मिटवण्यासाठी त्यावर माती-रेती टाकली आणि मृतदेह धामणा नदीवरील पुलाखाली फेकून दिल्याचे समाेर आले. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी घटनेची माहिती मिळताच धाड पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धाड ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

Murder in Amravati : महिनाभरापासून बेपत्ता होता; थेट मृतदेहच सापडला!

प्राथमिक चौकशीतून मृतकाचा भाऊ राहुल फदाट यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला. पाेलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करून संशयित वैभव भोपळे आणि पवन बकाल यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चाैकशी केल्यानंतर त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली. या घटनेची माहिती मिळताच ८ फेब्रुवारी राेजी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक लांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.