Breaking

Mahakumbh : वर्धेच्या कन्येने प्रयागराजमध्ये उभारले २६ डोम!

 

Wardha girl built 26 domes in Prayagraj : डोममधूनच होतेय महाकुंभचे दर्शन

Wardha उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभ मेळावा सुरू आहे. तब्बल १४४ वर्षांनी या वेळी महायोग आला आहे. या मेळाव्यात भाविकांच्या राहण्यासाठी येथील मूळची रहिवासी असलेल्या ऐश्वर्या चौधरी यांनी उत्तर प्रदेश स्टेट टुरीझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या समन्वयाने २६ डोम उभारले आहेत.

प्रयागराजमध्ये महाकुंभच्या निमित्ताने प्रथमच भारतातील पहिली डोम सिटी उभारण्यात आल्याचे सांगितले जात आहे. येथील आर्किटेक्ट ऐश्वर्या प्रज्ञा रूपकुमार चौधरी यांनी ही सिटी उभारण्यासाठी मोलाची मदत केली आहे. त्यांनी पॉली कॉर्बोनेट मटेरियलपासून तेथे डोमची निर्मिती केली आहे.

Love marriage : प्रेमच नव्हे, लग्नही करा बिनधास्त !

हे डोम पारर्दशी आहेत. जमिनीपासून १५ फूट उंच असल्याने डोममधूनच भाविकांना महाकुंभचे ३६० कोनातून दर्शन घेता येते. ऐश्वर्या यांच्या कल्पकतेतून साकारलेली ही डोम सिटी भाविकांच्या आकर्षणाची केंद्रबिंदू ठरली आहे.

ऐश्वर्या चौधरी यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण येथील स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये घेतले. नंतर त्यांनी मुंबईच्या भारती विद्यापीठातून आर्किटेक्टची पदवी घेतली. नंतर त्यांनी नैनितालमधील गिलीमिट्टी येथे दीड वर्ष सस्टेनेबल आर्किटेक्ट आणि नॅचरला बिल्डिंग रिसर्चर म्हणून काम केले. दरम्यान, त्यांनी झारखंडमधील चाकूलिया, उत्तर प्रदेशमधील श्यामली, उत्तराखंडमधील नैनिताल येथे कार्यशाळा घेतल्या.

CM Devendra Fadnavis : महापालिकेत तीन दिवसांत तीनशेहून अधिक तक्रारी!

ऐश्वर्या चौधरी यांनी प्रयागराज येथे निर्माण केलेली डोम सिटी कौतुकाचा विषय ठरली आहे. उत्तर प्रदेश स्टेट टुरीझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या समन्वयाने त्यांनी काम पूर्ण केले. २६ डोममध्ये एकूण ४० वूडन लक्झरी कॉटेजेस आहेत. त्याचा अनेक भाविकांना लाभ होत आहे. ऐश्वर्याने प्रयागराजमध्ये उभारलेल्या डोम सिटीचे सर्वत्र कौतुक होत आहे.