नागपूर
Nagpur got 92 police sub-inspectors : खडतर प्रशिक्षणानंतर सेवेत रुजू होण्यास सज्ज
तेरा महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर 92 पोलीस उपनिरीक्षक आपल्या सेवेत रुजू होण्यास सज्ज झाले आहेत. नागपूरला त्यानिमित्ताने एक नवी तुकडी पोलीस उपनिरीक्षकांची लाभली आहे. उपराजधानीचे शहर म्हणून पोलिसांवर सातत्याने ताण वाढत आहे. अशात काही प्रमाणात का होईना नागपूर पोलिसांना थोडा आधार होणार आहे.
राज्य पोलीस दलातील 124 व्या तुकडीत 620 पोलीस उपनिरीक्षकांनी प्रशिक्षण घेतले. सलग 13 महिन्यांचे खडतर प्रशिक्षण घेऊन पोलीस दलात रुजू होण्यासाठी सारेच सज्ज झाले आहेत. त्यापैकी 92 पोलीस उपनिरीक्षक नागपूर शहर पोलीस दलात परीविक्षाधीन अधिकारी म्हणून गुरुवारी रुजू झाले आहेत. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल Dr Ravinder Singal यांनी नव्या दमाच्या सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत करुन त्यांच्याशी संवाद साधला.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, शहरी आणि ग्रामीण भागातून 620 युवक व युवतींची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड करण्यात आली. त्यांना नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्रात 13 महिन्यांचे खडतर प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण करुन पोलीस उपनिरीक्षकांनी पोलीस दलात प्रत्यक्ष सहभागी होण्याचा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
Nitin Gadkari : गडकरींनी मांडला 1600 एकल विद्यालयांचा आदर्श!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कठीण परीक्षेतून निवड झालेला हा युवा वर्ग आता पोलीस विभागासाठी कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज झाला आहे. एकूण 620 पोलीस उपनिरीक्षकांची 124 वी तुकडी आहे. त्यांनी आंतरवर्ग आणि बाह्यवर्ग परीक्षा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. त्या अधिकाऱ्यांचा दीक्षांत सोहळा 20 डिसेंबर 2024 ला महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे पार पडला. या तुकडीतील गुणवत्ता यादीनुसार पहिले 92 पोलीस उपनिरीक्षक नागपूर पोलीस आयुक्तालयात रुजू झाले आहेत. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी या अधिकाऱ्यांचे स्वागत केले. त्यांना मार्गदर्शन करीत कर्तव्याची जाणीव करुन दिली. शुक्रवारपासून (3 जानेवारी) सर्व अधिकारी विविध पोलीस ठाण्यात नियुक्त झाले आहेत.
Dakshin Express Incident : मजुराचा रेल्वे प्रवास ठरला अखेरचा !