Breaking

Radhakrishna Vikhe Patil : ठाकरे गटाच्या नेत्यांना सन्यासच घ्यावा लागेल !

 

Thackeray group leaders will have to resign : आता काँग्रेसची सत्ता नाही आणि येण्याची शक्यताही नाही

Nagpur : सद्यस्थितीत कोण कुठला पक्ष सोडून कुठल्या पक्षात जात आहे, हेच कळेनासे झाले आहे. महाविकास आघाडी सैरभैर झाली आहे. पण एक मात्र खरे की, ठाकरे गटाच्या नेत्यांना आता सन्यास घेतल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून सर्वाधिक वेगाने तेच पर्याय शोधत आहे, असे जन संसाधन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

नागपुरात आज (१३ फेब्रुवारी) विखे पाटील पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडीबाबत बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून त्यांची बिघाडी सुरु होती. सत्ता मिळवणे हा एकमेव उद्देश त्यांचा होता. राज्याच्या किंवा समाजाच्या हितासाठी ते एकत्र आलेच नव्हते. तर सत्ता मिळवणे हा एकमेव हेतू होता. शरद पवारांबद्दल त्यांना का राग आहे आणि शरद पवारांना कशासाठी फारकत घ्यायची, हे त्या दोघांनाच माहिती.

Nana Patole : नाना पाटोलेंच्या राजीनाम्याचे काँग्रेस श्रेष्ठींनी काय केले?

लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत, न्यायालयाने दिलेल्या मतावर भाष्य करणे उचित नाही. राज्यात सुरू असलेल्या कल्याणकारी योजना या जनतेच्या हितासाठी आपण सुरू केलेल्या आहेत. न्यायालयाने काय मत मांडले, याबद्दल मला काही माहिती नाही. शेतीमध्ये मजूर मिळत नाही, ही सगळी कारणे असले तरी याकरिता योजना बंद करण्याची गरज नाही. वेगळा पर्याय असू शकतो यावर चर्चा होण्याची आवश्यकता असल्याचे मत मंत्री विखे पाटलांनी व्यक्त केले.

छगन भुजबळ यांच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या महत्वाकांक्षेबद्दल विचारले असता, भुजबळ साहेबांबद्दल जो काही निर्णय असेल, तो पक्ष नेतृत्व घेईल, असे ते म्हणाले. पक्षांतराच्या बाबतीत ज्यावेळी संपर्कात असल्याची चर्चा होते. तेव्हा काही लोकांची मानसिकता असेलही. मात्र माझ्या कोणी संपर्कात नाही, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

Kirit Somaiya, Sunil Deshmukh : अंजनगावातील ‘बांगलादेशी’ प्रकरण तापले!

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांच्या नियुक्तीच्या चर्चेबाबत विचारले असता, काँग्रेसची सत्ता होती म्हणून लोक होते. आता काँग्रेसची सत्ता नाही आणि येण्याची शक्यताही नाही. एवढी निश्चांकी काँग्रेसने कधीच गाठली नव्हती. त्यामुळे प्रत्येक जण एक-दुसऱ्याकडे बोट दाखवत आहे. प्रदेशाध्यक्ष पद कोणी घ्यायला तयार नाही, असे त्यांनी सांगितले.

हर्षवर्धन माझा चांगला मित्र आहे. त्याला संधी मिळाली तर चांगली गोष्ट आहे. मात्र दिग्गजांना डावलून संधी दिली, हे म्हणणं योग्य नाही. कारण दिग्गजच सगळे पळून गेले. सत्ता नाही म्हणून संधी नाकारणारे हे दिग्गज यांचं पक्षश्रेष्ठी समोर पितळ उघड पडत आहे, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

शिवभोजन थाळी बंद करण्यासंदर्भातले कोणतेही आदेश झाल्याचे माझ्या निदर्शनास नाहीत. महायुतीबद्दल विचारले असता, सरकार उत्तमरित्या सुरू आहे. कोणतीही नाराजी नाही. सरकार चांगलं चालत असल्याने काही लोकांना मात्र नाराजी आहे, असे त्यांनी सांगितले.