Breaking

Chandrashekhar bawankule : जखमींच्या उपचारात कोणतीही कमतरता पडू देऊ नका

 

Do not allow any deficiency in the treatment of the injured in Kalameshwar blast : पालकमंत्री बावनकुळे यांचे प्रशासनाला निर्देश

Nagpur काटोल तालुक्यातील कोतवालबड्डी येथील एशियन फायर वर्क्स बारूद कंपनीमध्ये स्फोट होवून या दुर्दैवी घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला. काहीजण जखमी झाले आहेत. या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशी करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

एशियन फायर वर्क्स कंपनीत स्फोटामुळे मोठी आग लागली. कंपनीत ठेवलेले सर्व गठ्ठे आणि सामान आगीत जळाले. पोलिसांनी लगेच अग्निशमन दलाला पाचारण केले. काही वेळातच अग्निशमन दलाची सहा वाहने कंपनी पोहचली. त्यांनी आगीवर पाण्याचा मारा करीत दोन तास प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर काही वेळातच रुग्णावाहिका पोहचल्या.

Kalmeshwar accident: कळमेश्वरमधील बारूद कारखान्यात स्फोट

गंभीर जखमींनी लगेच शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
कंपनीत स्फोट होताच मोठा आवाज झाला तसेच कंपनीला आग लागली. त्यामुळे आजुबाजुच्या गावातील अनेकांनी कंपनीच्या दिशेने धाव घेतली. काही मिनिटांतच स्फोटाची वार्ता अनेकांपर्यंत पोहचली. त्यामुळे कंपनीत गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. काही गावकऱ्यांनी कंपनीतील कर्मचाऱ्यांना मदत केली. मात्र, अनेक जण बघ्याच्या भूमिकेत असल्यामुळे पोलिसांनाही कर्तव्य बजावताना अडचणीचे ठरत होते.

Indurikar Maharaj : सैन्यात शेतकऱ्यांची मुलं, ही शिवरायांची किमया !

या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी तेथील स्थितीचा आढावा घेतला. प्रशासनातील सर्व सबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आहेत. बचाव आणि मदत कार्याबाबत मी प्रशासनाच्या संपर्कात राहून माहिती घेत आहे. या अपघातातील जखमींवर उपचार सुरू असून त्यांना प्रशासनातर्फे सर्वोतोपरी मदत केली जात आहे असे त्यांनी सांगितले.
या घटनेत मृत्यू झालेल्या कामगार कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

जखमी कामगारांना उपचारात कोणतीही कमतरता पडू नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.