Breaking

Robbery in Nagpur : नोकराने मालकाच्या डोळ्यात मिरचीपूड झोकली अन् मग..

The servant threw chili powder in the owner’s eyes and then : घटनेच्या काही मिनिटानंतर पोलीस तेथे पोहचले

Nagpur : लाखो रुपयांची खरेदी-विक्रीचा व्यवहार होत असलेल्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराने मालकाला लुटण्याचा कट रचला. त्यात काही साथिदारांना सहभागी करुन घेतले. सर्वांनी सारख्या प्रमाणात पैसे वाटून घेण्याचे ठरविले. कटानुसार तीन लाखांची रक्कम घेऊन दुचाकीने घरी जाणाऱ्या मालकावर रस्त्यातच हल्ला केला.

मालकाच्या डोळ्यात मिरचीपूड झोकून तीन लाख रुपये लुटून कामगारांनी पळ काढला. पोलिसांनी तपासात व्यवसायिकाच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच त्याच्या साथिदारांसोबत मिळून ही लूट केल्याचे तपासात पुढे आले आहे. श्रीराम राजेंद्र पराते (२४, रा. वनदेवीनगर, यशोधरानगर) असे कर्मचाऱ्याचे तर प्रवीण उर्फ बिट्टू विजय पटले (२२, रा. गणेश चौक, गुलशननगर) आणि रोहित उर्फ मोनू उमेश पवार (२०, गुलशननगर, कळमना) अशी त्याच्या आरोपी साथिदारांची नावे आहेत.

Nagpur Traffic Police : शहरातील अस्ताव्यस्त वाहतूक बघून तुम्हाला पण राग येतो का ?

लुटीमध्ये सहभागी मोहसीन उर्फ गरम खान (३० रा. यशोधरानगर) याला पोलिसांनी आधीच अटक केली होती. दर्शन किंगराणी (३२, जरीपटका) हे व्यवसायिक असून लकडगंज हद्दीत त्यांचे जे. बी. ट्रेडर्स या नावाने दुकान आहे. दुकानात श्रीराम पराते कामावर आहे. मालक हे नियमितपणे दुकानातून सायंकाळच्या सुमारास घरी निघतात. सोबत दिवसभऱ्यातील रोख रक्कमही घेऊन जातात. ही संपूर्ण माहिती श्रीराम याला होती.

श्रीरामने मोहसीन, प्रवीण आणि रोहित तसेच अन्य दोन साथिदारांना यांना हाताशी धरून दर्शन किंगराणी यांना लुटण्याची योजना आखली. घटनेच्या दिवशी म्हणजे शनिवारच्या (२२ फेब्रुवारी) सायंकाळी ते दुकानातून दुचाकी वाहनाने निघाले. तत्पूर्वी, त्यांनी दुचाकीच्या डिक्कीत तीन लाख रुपये ठेवले. ईतवारी मालधक्का परिसरातून जात असताना समोर वाहनांची वर्दळ असल्याने ते रस्त्यात थांबले.

किंगराणी थांबले असता एकाने त्यांच्या डोक्यावर लाकडी दांडा मारला तर दुसऱ्याने डोळ्यात मिरचीपूड झोकली आणि दुचाकीच्या डिक्कीतील तीन लाख रुपये घेऊन पळाले. आरडाओरड होताच लोकांनी पाठलाग करून मोहसीनला पकडले आणि चांगला चोप दिला. घटनेच्या काही मिनिटानंतर पोलीस तेथे पोहचले. आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले. तपासात गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ३ च्या पथकाला श्रीराम पराते याच्यावर संशय आला.

Chhagan Bhujbal : आता लासलगाव येथे थांबणार देवळाली-दानापूर शेतकरी समृध्दी किसान रेल्वे

श्रीरामची सखोल विचारपूस केली असता त्याने वरील घटना घडवून आणल्याचे सांगितल्यानंतर घटनेतील अन्य पसार आरोपींनाही पोलिसांनी अटक केली. घटनेत आरोपी सोनू उर्फ फारूख शेख आमीर (३२, रा. वनदेवीनगर चौक, झोपडपट्टी) आणि संतोष बाबाराव चव्हाण (२८, रा. गुलशननगर) हे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. कारवाईत पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एक ई-रिक्षा व ३ मोबाईल असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा जप्त केला.