Breaking

Election Petition : आमदार साजिद खान यांना उच्च न्यायालयाची नोटीस

High Court issued notice to MLA Sajid Khan : विधानसभा निवडणुकीत अवैध मतदानाचा आरोप; विजय अग्रवाल यांची याचिका

Akola अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण अवैध मतदानामुळे विजयी झाल्याचा आरोप भाजपचे पराभूत उमेदवार विजय अग्रवाल यांनी केला होता. यासंदर्भा त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. सुनावणी दरम्यान न्यायालयाने आमदार पठाण यांना नोटीस बजावली आहे. १८ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विदर्भातील अनेक पराभूत उमेदवारांनी न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केल्या आहेत. मात्र, काँग्रेसच्या विजयी उमेदवाराविरुद्ध ही एकमेव याचिका दाखल झाली आहे. २४ फेब्रुवारी रोजी नागपूर खंडपीठात न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या समोर सुनावणी झाली. या प्रकरणात विजय अग्रवाल यांच्यातर्फे ॲड. रोहन मालविय आणि ॲड. हरीश ठाकूर यांनी युक्तिवाद केला.

Narhari Zirwal : राज्यात अन्न भेसळ तपासणीसाठी 28 Mobile Lab!

दरम्यान साजीद खान यांनी अशाप्रकारची कुठलीही नोटीस मिळाली नसल्याचा दावा केला आहे. मला अद्याप कोणतीही नोटीस मिळालेली नाही. नोटीस प्राप्त झाल्यानंतर विधिज्ञांमार्फत कायदेशीर उत्तर सादर केले जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे,

Swargate Rape Case : उसाच्या शेतात लपून बसला होता आरोपी!

काय आहे प्रकरण?
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मुस्लीमबहूल बुथवर अवैध मतदान झाल्याचा आरोप होता. यासंदर्भात भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल यांनी आक्षेप घेतला होता. तसेच मुबंई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. निवडणूक मतदार यादीतही ३५ हजार बोगस मतदार असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे ही निवडणूकच अवैध ठरवावी, अशी मागणी अग्रवाल यांनी याचिकेमार्फत केली होती.