Vijay Wadettiwar raised the problems of people affected by coal mining : चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाण व्यवस्थापनाची नियमबाह्य कामे सुरू
Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यात एकुण ५० ते ५५ कोळसा खाणी आहेत. सर्वच्या सर्व खुल्या स्वरुपाच्या खाणी आहेत. या खाणीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील लोक काय काय सहन करत आहेत, याची कल्पना इतरांना येणार नाही. खाणीच्या परिसरातील घरांना तडे जाण्याचे प्रमाण जास्त आहे. लोकांवर घरे सोडून जाण्याची वेळ येत आहे, असे म्हणत काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात कोळसा खाण बाधित लोकांच्या समस्या मांडल्या.
ओपनकास्ट खाणीमध्ये खोलवर जाऊन कोळसा काढला जातो. ती पोकळी भरण्यासाठी काहीही कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे तेथे पाणी साचते. विनवण्या, पत्र, निवेदने देऊनही मुजोर खाणमालक ऐकत नाहीत. रात्रीच्या वेळीही ब्लास्टींग सुरू असते. परिणामी लोक झोपू शकत नाहीत. अनेक लोक घरं सोडून गेले. त्यांनाही मोबदला दिला गेला नाही. अशी भयावह परिस्थिती असतानाही काही केले जात नसेल, तर लोकांचा आपल्यावर विश्वास बसणार कसा, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
Vijay Wadettiwar : पुनर्वसन न करता गावाचा रस्ता खोदलाच कसा ?
हा विषय केंद्र सरकारशी संबंधित आहे. त्यामुळे या परिसराचा सर्वे करून घ्यायला हवा. अरविंदो कंपनीच्याच्या संदर्भात हेच झाले. चार गावांचे पुनर्वसन झाले नाही. तरीही कंपनीने कोळसा उत्पादनाचे काम सुरू केले. पहिल्यांदा पुनर्वसन करायला पाहिजे, असे धोरण आहे. पण अद्याप एकाही गावाचे पुनर्वसन झाले नाही, हे मी जबाबदारीने सांगतो, असे वडेट्टीवार म्हणाले.
लोकांच्या व पदाधिकाऱ्यांच्या अनेक तक्रारींनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी खाण बंद केली. पण वरून आदेश आला आणि सुरू झाली. कुणाचा आदेश आहे, हे मुख्यमंत्र्यांनी बघावे. गावाला जाणारा रस्ता जिल्हा परिषदेचा आहे. खाण व्यवस्थापनावे तो खोदला. गावकऱ्यांनी सांगितले प्रती एकर ३५ लाख रुपये पाहिजे. पण त्यावर कंपनीकडून कुठलीही दाद मिळाली नाही. ही दादागिरी आली कशी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
Sanjay Raut-Vijay Wadettiwar : राऊत म्हणाले, धंगेकर सत्तेच्या वळचणीला लागले!
खाण परिसरातील पाण्याचा स्त्रोत कमी झाला आहे. सरकार पुढाकार घेऊन सीएसआर निधीमधून पाणी उपलब्ध करून देईल का? नुकसान भरपाई करून देण्यासाठी कार्यवाही करणार का? अरविंदो कंपनी बंद करण्याचा आदेश देणार का, असे प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केले. भद्रावती तालुक्यात नियमबाह्य कामे सुरू आहेत. कोळसा खाणीनी तीन गावांना वेठीस धरले आहे. नवीन पालकमंत्र्यांना या प्रकाराची सगळी माहिती आहे, असे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक ऊईके यांच्याकडे बोट दाखवत वडेट्टीवार म्हणाले. यासंदर्भात अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक लावावी, अशी मागणीही त्यांनी केली.
Vijay Wadettiwar : बव्हंशी मुस्लिम शिवाजी महाराजांसोबत होते !
संबंधित कोळसा कंपनीने विहित कालावधीत पुनर्वसन केले नसेल. अटी शर्तीचे पालन केले नसेल तर त्यांना सूचना दिली जाईल. तडे जाण्याबाबत डिस्ट्रीक्ट माईनिंग ऑफीसरकडे निवेदन मिळालेले नाही. तरीही उपस्थित प्रश्नावरून परिसरातील घरांचा सर्वे केला जाईल. ब्लास्टींगमुळे तडे गेले असतील तर कारवाई नक्कीच केली जाईल. कंपनीने खोदलेला डायर्व्हशन करून देता येईल. डायव्हर्शनचे काम किती झाले, याची माहिती घेतो. पुनर्वसनाच्या कामाला गती देण्यासाठी माझ्या दालनात कंपनीचे अधिकारी, महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतो, असे खनिकर्म मंत्री शंभुराज देसाई या प्रश्नावर म्हणाले.