Breaking

The body was found suspicious condition : संतप्त नातेवाईकांनी चौकातच दिला ठिय्या !

After the youth’s death, the atmosphere in Deulgaon Raja became heated : युवकाच्या मृत्यनंतर देऊळगावराजातील वातावरण तापले

Deulgaon Raja शहरातील आंबेडकर नगरातील २२ वर्षीय युवकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. पिंपळगाव चिलमखा शिवारातील वनविभागाच्या हद्दीत ३ जानेवारी राेजी ही घटना उघडकीस आली. सुरज दीपक कासारे असे मृतक युवकाचे नाव आहे. या युवकाचा घातपात झाल्याचा आराेप करीत नातेवाईक आक्रमक झाले हाेते. या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करावी, या मागणीसाठी नातेवाईकांनी बसस्थानक चौकात ठिय्या आंदोलन केले.

४ जानेवारीला छत्रपती संभाजीनगर येथे इन कॅमेरा शवविच्छेदन झाले. त्यानंतर मृतदेह देऊळगावराजा येथे आणला होता. सुरज कासारे याचा मृतदेह वनविभागाच्या हद्दीत आढळून आला होता. दरम्यान, देऊळगावराजा पोलिसांनी घटनास्थळी जात पार्थिव देऊळगावराजा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले होते. त्याची माहिती नातेवाईकांना मिळाल्यानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली.

Mother Leopard : बछड्यासाठी कासावीस झाली बिबट !

दरम्यान, शवविच्छेदनाची संपूर्ण चित्रफीत काढण्यात यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली. त्यामुळे पार्थिव छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आले होते. तेथे शवविच्छेदन करण्यात आले. ४ जानेवारीला मृतदेह घेऊन रुग्णवाहिका देऊळगावराजा येथे आली. त्यावेळी प्रकरणातील आरोपींना पकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. त्यासाठी नातेवाईकांनी बसस्थानक चौकात ठिय्या दिला होता.

सुरज कासारे याचा घातपात झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. त्यामुळे वातावरण काहीसे तणावपूर्ण बनले होते. परिस्थितीचे गांभीर्य पाहता उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम यांनी लक्ष घातले. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करू, असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.

Lonar Lake : शंभर शाळा लोणार सरोवराच्या भेटीला !

नातेवाइकांना घातपाताचा संशय
सुरज कासारे याचा घातपात झाल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणाची चाैकशी करून दाेषीवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली. त्यासाठी ठिय्या आंदाेलन करण्यात आले. मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी नातेवाइकांनी दिला. पाेलिसांनी वेळीच मध्यस्थी करून कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदाेलन मागे घेण्यात आले.