Breaking

Crime in Nagpur : पाळीव कुत्र्याने शोधला मालकाचा मृतदेह!

Pet dog finds owner’s body : कुऱ्हाडीने वार करून शेतकऱ्याचा खून

Nagpur पाळीव प्राण्यांना जेवढं प्रेम दिलं, तेवढ्या प्रेमाची परतफेडही ते करतात. ही परतफेड करण्याचा प्रत्येक प्रसंग आनंदाचाच असेल असं नाही. नागपूर जिल्ह्यात अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना पुढे आली आहे. एका शेतकऱ्याचा निर्घुण खून करण्यात आला. पण याची खबर कुणालाच नव्हती. एका निर्जनस्थळी मृतदेह पडला होता. शेतकऱ्याच्या पाळीव कुत्र्याने हा मृतदेह शोधून काढला. घटना दुर्दैवी आहे. पण कुत्र्याने केलेली प्रेमाची परतफेड कुटुंबियांना आयुष्यभर लक्षात राहणारी आहे.

देविदास उर्फ गजू चचाणे (वय ५८) हे पिलकापार या त्यांच्या गावापासून दोन किलोमीटर जंगलात गुरे चारायला गेले. तिथे त्यांचा अज्ञात आरोपीने कुऱ्हाडीने हल्ला करुन खून केला. सायंकाळ झाल्यावर गुरे घरी परतली. मात्र, देविदास घरी आले नाहीत. कुटुंबीय चिंतेत पडल्यानंतर घरातील पाळीव कुत्रा भुंकत जंगलाच्या दिशेने पळायला लागला. त्यामुळे कुटुंबीयसुद्धा कुत्र्याच्या मागे निघाले. एका तलावाजवळ गेल्यानंतर अंधारात मालकाच्या मृतदेहाजवळ कुत्रा थांबला. या घटनेनंतर कळमेश्वर पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला.

Zilla Parishad Nagpur : Timepass करणाऱ्या ३० कंत्राटदारांना दणका

देवीदास चचाणे हे पत्नी व दोन मुलांसह पिलकापार (कळमेश्वर) येथे राहतात. घरी थोडीफार शेती आहे. जोडधंदा म्हणून ते दुग्धव्यवसाय करतात. घरातील गायी-म्हशींना देवीदास रोज जंगलात चारायला घेऊन जायचे. नेहमीप्रमाणे सकाळी अकरा वाजता गायी-म्हशी घेऊन गावापासून दोन किमी असलेल्या जंगलात घेऊन गेले. खुर्सापार तलावाजळ देवीदास हे गायी-म्हशी चारत होते.

सायंकाळच्या सुमारास अज्ञात आरोपीने देवीदास यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात देवीदास यांचा मृत्यू झाला. आरोपीने तलावाजवळच मृतदेह फेकून पळ काढला. सायंकाळी गायी-म्हशी घरी परत आल्या. मात्र, देवीदास हे घरी परतले नाही. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत पडले. दरम्यान, देवीदास यांनी पाळलेला कुत्रा भुंकायला लागला. देवीदास यांचा मोठा मुलगा दर्शन याच्या हातातील दोरी तोंडात पकडून बाहेर न्यायला लागला.

त्यामुळे दर्शन आणि अन्य कुटुंबीय त्याच्या मागे निघाले. खुर्सापार तलावापर्यंत कुत्रा भुंकत गेला. काही अंतरावर जाऊन थांबला. अंधारात सर्व जण कुत्र्याजवळ पोहचले. तेथे देवीदास यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह दिसून आला. दर्शनने कळमेश्वर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळावर पोहचले. हितज्योती फाऊंडेशनचे हितेश बन्सोड यांनी मृतदेह कळमेश्वर येथील शासकीय रुग्णालयात पोहचवला. तक्रारीवरुन हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला.

Crime in Khamgao : शेगावात मुख्याध्यापिकेला लाच घेताना रंगेहाथ पकडले!

देवीदास यांच्या खुनाचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून काही संशयितांवर आम्ही नजर ठेवली आहे. लवकरच या हत्याकांडाचा उलगडा होईल, अशी प्रतिक्रिया आय़पीएस अधिकारी अनिल म्हस्के यांनी दिली.