‘Chanakya’ Center in 35 colleges : कौशल्य विकासासाठी सरकारचे महत्त्वाचे पाऊल
Buldhana जिल्ह्यातील युवक युवतींना कौशल्य विकासाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यात ३५ महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील उमेदवारांनी या महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त ग.प्र. बिटोडे यांनी केले आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व देण्यात आले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तसेच युवक युवतींना कौशल्य विकासाची संधी महाविद्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही नाविन्यपूर्ण योजना सुरू केली आहे.
Scholarship Conference : चालू शैक्षणिक वर्षातच मिळावी शिष्यवृत्ती
राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करून 15 ते 45 वयोगटातील युवक युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करून त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहे.
प्रशिक्षण क्षेत्र : जीएसटी सहाय्यक, सॅाफ्टवेअर डेव्हलपर, फिल्ड टेक्निशियन, डाटा एन्ट्री ॲापरेटर, ईलेक्ट्रीशियन, सोलर पॅनल इन्स्टॅालेशन टेक्निशियन, जनरल ड्यूटी असिस्टंट, मोबाईल हार्डवेयर टेक्निशियन, हॅण्डसेट ॲण्ड टॅबलेट रिपेअर टेक्निशयन, डिझाईनर मेकॅनिकल इत्यादी पदांच्या कामाचे प्रशिक्षण महाविद्यालयनिहाय आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रात दिले जाणार आहे.
जिल्ह्यातील चाणक्य केंद्रे
1. गुंजकर कॉलेज आवार, 2.गुरुकुल चित्रकला महाविद्यालय बुलढाणा, 3.गुरुकुल कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी बुलढाणा ,4. के बीजे आयटीआय बोरखेडी, तालुका मोताळा, 5.माऊली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, 6.न्यू सिटीजन टेक्निकल इन्स्टिट्यूट बुलढाणा, 7.प्रबोधन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बुलढाणा, 8.राजीव गांधी आर्ट्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज सिंदखेड राजा, 9.राजमाता वोकेशनल ट्रेनिंग सेंटर, 10.संत गजानन महाराज नर्सिंग स्कूल शेगाव
CM Devendra Fadnavis : जलसंधारण प्रकल्पांसाठी आता नवीन Policy!
11.सावळे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज लखनवाडा बुद्रुक, 12.स्व. प्रकाश भाऊ बावस्कर महाविद्यालय सावळी, 13.स्वर्गीय दयासागर जी महाले प्रायव्हेट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उंद्री, 14.श्रीमती कावेरी देवी केदार माल अग्रवाल आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज मलकापूर,15.राजे छत्रपती कला महाविद्यालय धामणगाव बडे, 16.कुलस्वामिनी ज्युनिअर कॉलेज पिंपळगाव देवी, 17.अनुदानित आदिवासी उच्च माध्यमिक आश्रम शाळा येळगाव, 18.राजे छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जयपुर, 19.चक्रधर स्वामी आर्ट जुनियर कॉलेज मढ, 20.पैनगंगा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग येळगाव
21.स्किल पॅरामेडिकल कॉलेज बुलढाना,22.राजे छत्रपती ज्युनिअर कॉलेज धामणगाव बढे, 23.खामगाव पॅरामेडिकल कॉलेज खामगाव, 24.छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था बोराखेडी, 25.राष्ट्रमाता तुकडोजी महाराज प्रायव्हेट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट खामगाव,26.सहकार महर्षी लेट भास्करराव शिंगणे आर्ट कॉलेज खामगाव, 27.अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी चिखली, 28.पी आर एम एस एस अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी चिखली, 29.झेड ए उर्दू जुनिअर कॉलेज मलकापूर 30. विश्व कौशल्य अँड एम्पॉवरमेंट प्रायव्हेट इंडस्ट्री ट्रेनिंग बुलढाणा.
31. एसएमटी इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज नांदुरा. 32. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय 33. श्री पुंडलिक महाराज महाविद्यालय नांदुरा, 34. गावंडे कॉलेज ऑफ फार्मसी साखरखेर्डा 35. आदिवासी ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स टुनकी बीके या जिल्ह्यातील 35 महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र कार्यान्वित केले जात आहे.
जिल्ह्यातील उमेदवारांनी या महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षणासाठी भेट द्देवून प्रशिक्षण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, ग.प्र. बिटोडे यांनी केले आहे.