Breaking

Nagpur Municipal Corporation : ठरलं..! नाग नदी प्रकल्प पाच टप्प्यात राबविणार!

Nag River project will be implemented in five phases : सर्वेचे काम होताच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात

Nagpur नागनदी पुनरुज्जीवन हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. या प्रकल्पानंतर नागपूरचा चेहरामोहरा बदलेल, सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागेल. भविष्यात नागनदीतील पाण्यातून बोट धावू शकेल, असं स्वप्नही गडकरींनी बघितलं आहे. या प्रकल्पाचे काम सुरू होण्याचा दिवस आता दृष्टीपथात आहे.

नागपूर शहरासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प पाच टप्प्यात राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. नागपूर महापालिकेने सल्लागार म्हणून टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स लिमिटेड (टीसीई) कंपनीची नियुक्ती केली आहे. कंपनीकडून प्रकल्प आराखडा, ग्राऊंड सर्वे केला जात आहे. सर्वेचे काम होताच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली होईल.

शहराचे वैभव असलेल्या नाग नदीला प्रदूषणमुक्त करण्याचा १ हजार ९२७ कोटींचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ८ वर्षांमध्ये प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे; मात्र मनपाने पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. या प्रकल्पासाठी ६० टक्के निधी केंद्र सरकार, २५ टक्के निधी राज्य सरकार आणि १५ टक्के निधी नागपूर महापालिका देणार आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात यासाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

महापालिकेचा या प्रकल्पात ३०० कोटींचा वाटा आहे. यासाठी आवश्यक तरतूद केली जाईल, अशी माहिती मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिली. मध्य व उत्तर नागपुरातील सिवरेज नाग व पिवळी नदीत प्रक्रिया न करताच सोडण्यात येणारे सांडपाणी व कारखान्यातील दूषित पाणी रोखण्यात येणार आहे.

यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. यात मलनिस्सारण केंद्रांची उभारणी व प्रक्रिया केंद्राला सिवरेज लाईन जोडण्यात येणार आहे.
नागनदी प्रकल्प राबवताना या प्रकल्पात व नदी प्रवाहाला बाधा ठरणारे अनधिकृत अतिक्रमण काढले जाणार आहे. टीसीईचा सर्वे अहवाल आल्यानंतर नागनदी पात्रालगतचे बाधा ठरणारे अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.