Breaking

Mahayuti Government : शिक्षण देणाऱ्या गाडीला लागला ब्रेक !

Plans to educate slum children failed : झोपडपट्टीतील मुलांना शिक्षित करण्याची योजना थंडबस्त्यात

Nagpur प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावे, त्यांना पुरेसा आहार मिळून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा महिला बालविकास विभागाकडून ऑगस्ट २०२३ पासून फिरते पथक तयार करण्यात आले होते. सहा महिन्यात ३०० मुलांनी शिक्षणाचे धडेही गिरवले. यातील १२३ मुले आजही नियमित शाळेत जायला लागली. मात्र वर्षभरापासून हा प्रकल्प बंद आहे.

शिक्षणापासून दूर असणारी चिमुकले शहरातील विविध चौका चौकात पाहायला मिळतात. या मुलांचे बालपण सुरक्षित व्हावे, यासाठी फिरते पथक जिल्हा महिला व बालविकास विभागाने सुरू केले होते. जिल्हा महिला व बालविकास विभागाच्यावतीने सह्याद्री फाउंडेशनला हे काम देण्यात आले होते. १ ऑगस्टपासून सुरू झालेला हा प्रकल्प वाठोडा, हिंगणा टी पॉइंट, मानकापूर, यशवंत स्टेडियम, ताजबाग आणि शितलामाता चौक यासारख्या १६ भागांतील गरजू मुलांपर्यंत पोहोचला. २५-२५ जणांनी बॅच तयार करून त्यांना शिक्षण देण्यात आले. केंद्र शासनाच्या मान्यतेने राज्य शासनाने हा प्रकल्प राबविला.

BJP CONGRESS : भाजप जोमात; काँग्रेस सुस्त !

जानेवारी २०२४ पर्यंतच या प्रकल्पाचे काम चालले, पुढेही हा प्रकल्प सुरू ठेवावा, अशी मागणी सह्याद्री फाउंडेशनचे प्रकल्प संचालक देवेंद्र क्षीरसागर यांनी केली. प्रकल्प चांगला होता, मात्र राज्याकडून पुढील मंजुरी आली नसल्याने फिरते पथक बंद करावे लागले, असे महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात आले.

ज्या भागात वाहन फिरणार त्याची कल्पना संबंधित पोलिस ठाण्याला दिली जात होती. या वाहनात सीसीटीव्ही आणि ट्रॅकिंग सिस्टिम लावण्यात आली. बसमध्ये बालस्नेही वातावरण राहील याची काळजी येथे घेण्यात आली होती. व्हॅनमधील मुलांना जवळच्या शासकीय शाळेत दाखल करण्याचे प्रयत्न शिक्षक आणि समुपदेशकांकडून करण्यात आले.

Vijay Wadettiwar on Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी करा

मुलांमध्ये व्यसनाधीनता, कुपोषण, काही शारीरिक व्यंग आढळल्यास इतर शासकीय योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचविण्यात आला. फिरत्या पथकाला अनाथ व एकटे बालक आढळल्यास त्यांचे समुपदेशन करून बालकल्याण समितीच्या आदेशाने बालगृहात दाखल केले जात होते. मुलांना एकत्रित करून प्रार्थना, योगासन, शारीरिक खेळ यासह शिक्षण देण्यात आले.