Young girl wrote ‘suicide note’ in German : आरशासमोर उभे राहून केली आत्महत्या
Nagpur काल्पनिक जगात वावरणाऱ्या १७ वर्षीय मुलीने ‘ऑनलाईन गेम’च्या नादात मृत्यूला आनंदाने स्विकारत घरातील आरशासमोर गळा चिरून आत्महत्या केली. यापूर्वी दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिसऱ्या प्रयत्नात तिने जर्मन आणि इंग्रजी भाषेत ‘सुसाईड नोट’ लिहून आत्महत्या केली. या मुलीच्या आत्महत्येमुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
ही तरुणी बाराव्या वर्गाची विद्यार्थिनी आहेत. तिचे वडिल बँकेत विभागीय व्यवस्थापक आहेत. तिच्या आईने तहसीलदार पदावरुन स्वेच्छा निवृत्ती घेतली. आईवडिलांना एकुलती असलेल्या स्विटीला ऑनलाईन मोबाईल गेम खेळण्याचा नाद होता. अभ्यासात हुशार असलेली तरुणी विदेशी संस्कृतीवर नेहमी लिखाण करीत होती. तसेच ‘आफ्टर डेथ’ after death हा शब्द नेहमी गुगलवर सर्च करीत होती. ‘मोबाईल गेम’नेच अखेर तिचा घात केला.
Ex-MLA Prakash Gajbhiye : प्रकाश गजभिये जम्मू-काश्मीरमध्ये जखमी
यापूर्वी तिने दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अपयशी ठरले. डिसेंबर २०२४ मध्ये तिने युरोप-अलास्कावरुन ऑनलाईन कुऱ्हाड बोलावली होती. ती घरातील आरशासमोर उभी झाली. तिने हातावर पाच चिरे मारले. त्यानंतर आरशात बघून स्वत:चा गळा चिरुन आत्महत्या केली. पहाटेच्या सुमारास तिची आई तिच्या खोलीत गेल्यामुळे ही घटना उघडकीस आली. तिने आत्महत्या करण्यापूर्वी जर्मन भाषेत ‘सुसाईट नोट’ लिहिली होती.
त्यात लिहिले होते की, माझ्यावर युरोपच्या जंगलातील एका पहाडावर अंत्यसंस्कार करा. तसेच ते शक्य न झाल्यास अमेरिकन तलाव किंवा अरब समुद्रात माझा मृतदेह टाका. मानवांनी पृथ्वी आणि पर्यावरणाला बरीच हानी पोहचवली आहे. माझ्या मृत्यूनंतर माझा एकही फोटो घरात ठेवू नका.’ अशा प्रकारचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे.
वडील कामानिमित्त बाहेर राहत होते तर आईसुद्धा आपल्या कामात व्यस्त राहायची. त्यामुळे पालक आणि पाल्यांत संवाद होत नव्हता. महिन्यांतून एखादेवेळी तिघेही सोबत जेवण करीत होते. त्यामुळे तिचा स्वभाव एकलकोंडा झाला होता. ती स्वतच्याच काल्पनिक जीवनात रमत होती. ती जर्मन, रशिया आणि युरोप या देशातील संस्कृती आणि कला याबाबत अभ्यास करीत होती.
तिने आत्महत्या केल्याचे प्रकरण सोमवारी सकाळी उघडकीस आले होते. मात्र, पोलिसांनी या प्रकरणात प्रसारमाध्यमांना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास मनाई केली. तसेच या प्रकरणात धंतोली ठाणेदार, सहायक पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तसुद्धा एक शब्द बोलत नव्हते. भविष्यात कोणत्याही मुलीने अशाप्रकारचे पाऊल उचलू नये, म्हणून या प्रकरणात अत्यंत गोपनीयता बाळगल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.