The uncle abused the minor niece : सश्रम कारावास आणि २५ हजार रुपयांचा दंड
Wardha नात्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम नातेवाईक आरोपी स्वप्नील (२४) याला २० वर्षे सश्रम कारावास सुनावण्यात आला आहे. तसेच २५ हजार रुपयांचा दंड आणि यातून दहा हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून पीडितेला देण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी दिला.
पीडित मुलगी मामाच्या गावी गेली होती. दि. १८ ऑक्टोबर २०२१ रोजी ती शेजारी राहणाऱ्या चुलत मामाच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी गेली. नराधम आरोपीने तिच्यावर जबरीने अत्याचार केला. मुलीच्या मामाने ही बाब तिच्या वडिलांना सांगितली होती. याप्रकरणात पुलगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
Collector of Buldhana : कारागृहातील कैद्यांना मुलभूत सोयीसुविधा मिळाव्यात
पुलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक सोनाली राठोड यांच्याकडे तपास सोपविण्यात आला होता. मोठ्या शिताफीने तपास केल्यानंतर आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सरकारतर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता गिरीश व्ही. तकवाले यांनी कामकाज पाहिले. त्यांना या प्रकरणात पैरवी अनंत रिंगणे यांनी साक्षीदारांना हजर करून मोलाची कामगीरी बजावली. शासनातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासले. पीडिता, पीडितेचे वडील, मामा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शेजारी राहणार महिला, वैद्यकीय अधिकारी व इतर साक्षीदारांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी आरोपीस कारावासाची शिक्षा ठोठावली.
गुन्ह्यांचा छडा लागतोय पण…
वर्धा जिल्ह्यात पोलिसांकडे येणाऱ्या छेडखानीच्या व विनयभंगाच्या किंवा बलात्काराच्या तक्रारींचा छडा लावण्यात शंभर टक्के यश येत आहे. अशी माहिती काही दिवसांपूर्वी पोलिसांनी दिली. गुन्ह्यांचा छडा लागत आहे आणि आरोपींना शिक्षा होत आहे, याचे समाधानच आहे. पण गुन्हा घडणारच नाही, असा धाक नराधमांमध्ये निर्माण करण्यात मात्र पोलिसांना सपशेल अपयश आले आहे. हेच या प्रकरणावरून दिसते.