Breaking

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray : अकोल्यात शिवसेना ठाकरे गटाला धक्का !

The leaders resigned and joined ShindeSena : जिल्हा संघटकासह पदाधिकाऱ्यांनी दिली सोडचिठ्ठी

Akola शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अकोला जिल्ह्यामध्ये अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. जिल्हा संघटक व महिला संघटकासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या Local Body Elections पार्श्वभूमीवर हा मोठा धक्का मानला जात आहे.

विधानसभा निवडणुकीदरम्यान अनेक इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने मोठ्या प्रमाणावर नाराजीचा सुरू उमटला होता. त्यातच पक्षासाठी संघटनात्मक काम करूनही संघटनेत फारसे महत्त्व दिले जात नव्हते. त्यामुळे नाराज पदाधिकाऱ्यांनी आता वेगळी चूल मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यातीलच काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे.

Mahayuti Government Farmers : सरकारकडून होतेय शेतकऱ्यांची कोंडी !

जिल्हा संघटकांसह काही पुरुष व महिला पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मुंबईत एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जिल्हा संघटक पदावरील विजय दुतोंडे, उपजिल्हाप्रमुख गजानन बोराळे, महिला जिल्हा संघटिका देवश्री ठाकरे, उपजिल्हा संघटिका रेखा राऊत, रुख्मिनी सोनवणे, शहर सचिव अविनाश मोरे यांनी गुरुवारी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला. यावेळी अकोला जिल्हा संपर्कप्रमुख गोपीकिशन बाजोरिया उपस्थित हाेते.

Gondia Farmers : भाजीपाला लागवडीत गोंदिया होतोय स्वावलंबी !

अकोला जिल्ह्यात शिंदेंचे बळ वाढले
एकसंघ शिवसेनेत फूट पडल्यानंतरही जिल्ह्यात त्याचा फारसा प्रभाव सुरुवातीच्या काळात जाणवला नव्हता. मात्र अकोला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे अनेकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून बाहेर पडणे बरे मानले आहे. त्यामुळे माजी आमदार गोपीकशन बाजोरिया यांच्यानंतर माजी जिल्हाप्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर व काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य गजानन पुंडकर यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. आता जिल्हा संघटक व महिला जिल्हा संघटिका यांनीही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची साथ सोडली आहे.