Gadkari had a phone conversation with Parveen Sultana : नितीन गडकरी रमले शास्त्रीय संगितांच्या आठवणींमध्ये
Nagpur नागपुरातील एका ज्येष्ठ शास्त्रीय संगीतकाराचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठानुसार गडकरींकडे आठवणी असतात, हे साऱ्यांनाच माहिती आहे. इथेही तसेच झाले. गडकरी भाषण देतानाच शास्त्रीय संगीताशी त्यांचं असलेलं नातं सांगत होते. त्यावेळी त्यांनी भूपेन हजारिका, बेगम परवीन सुलताना आणि गीतकार गुलजार यांचा उल्लेख केला.
उपासक, गायक व प्रचारक गुरुवर्य पं. श्यामसुंदर खर्डेनवीस व त्यांच्या सुविद्य पत्नी लेखिका, गायिका व अभिनेत्री शोभना चिकेरूर-खर्डेनवीस या कलायोगी दाम्पत्याचा सन्मान सोहळा पर्सिस्टंट सभागृहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन पं. श्यामसुंदर खर्डेनवीस सन्मान सोहळा समिती, आप्त व शिष्य परिवार तसेच वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेच्या संगीत विभागातर्फे करण्यात आले. यावेळी गडकरींनी खर्डेनवीस यांच्या कार्याचा गौरव केला.
गडकरी म्हणाले, ‘मी विमानाने प्रवास करतो तेव्हा माझ्या आवडीची गाणी ऐकण्यावर भर असतो. यात विशेषतः भूपेन हजारिका यांनी गायलेलं रुदाली चित्रपटातलं ‘दिल हुम हुम करे’ हे गुलजार यांनी लिहिलेलं गाणंही आहे. मला हे गाणं खूप आवडतं.’ त्यांनी आसामचा उल्लेख करून एक सुंदर आठवण सांगितली.
ते म्हणाले, ‘मी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आसामला गेलो होतो. योगायोगाने मी ज्या गावात होतो, ते सुप्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायिका बेगम परवीन सुलताना यांचं गाव होतं. त्यांचं वय जास्त आहे. त्यांच्याकडे अचानक जाणं योग्य नव्हतं. मी त्यांना फोन केला आणि संवाद साधला. मला खूप आनंद झाला.’ पुढे त्यांनी आसामच्या पुलाला भूपेन हजारिका यांचं नाव दिल्याचंही सांगितलं.
Makrand Jadhav Patil Hasan Mushrif : पश्चिम महाराष्ट्राकडे बुलढाणा, वाशीमचे पालकत्व
पुढे आम्ही आसाममध्ये एक मोठा ब्रीज बांधला. तो विक्रमी पूल आहे. मी त्या पुलाला भूपेन हजारिका यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला. भूपेन हजारिका यांचं शास्त्रीय संगीतात मोठं योगदान आहे. त्यांच्या नावामुळे पुलाला अधिक महत्त्व प्राप्त झालं. भारतीय शास्त्रीय संगीत आणि गायनाने आपल्या संस्कृतीला समृद्ध केलं आहे, असा उल्लेखही गडकरींनी केला.