Breaking

Nana Patole : नाना पटोलेंनी सांगितलं नागपुरातल्या आंदोलनामागील कारण !

If anyone objects to the leadership that brought freedom, it is unacceptable to the youth : स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या नेतृत्वावर कुणी आक्षेप घेत असेल, तर ते तरुणांना मान्य नाही

Nagpur News : युवक काँग्रेसने सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या विरोधात नागपुरात नुकतेच आंदोलन केले. त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. याच आंदोलनातून युवक काँग्रेस आणि काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली. आणि युवक काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्यात आले. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी या आंदोलनामागील कारण सांगितले.

आमदार पटोले आज (20 जानेवारी) नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले. युवक काँग्रेस युवकांची संघटना आहे. राष्ट्रीय पातळीवरून ही कारवाई केली गेली आहे. पक्षात शिस्त असली पाहिजे. राष्ट्रीय स्तरावर या सगळ्या घडामोडी झाल्या आहेत. महत्वाचे म्हणजे स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या नेतृत्वावर आक्षेप घेतला जात असेल, तर ते तरुणांना मान्य नाही. त्यामुळे ते आंदोलन झालं. त्यानंतर ती कारवाई काय झाली, हे मला माहिती नाही.

Nagpur Crime : बापाचा जीव जाईपर्यंत गळा आवळला!

बदलापूरच्या घटनेनंतर झालेल्या घडामोडींबद्दल पटोले यांना विचारले असता, बदलापूरची घटना खऱ्या अर्थाने राज्याला काळिमा फासणारी होती. सरकारच्या पोसलेल्या भक्षकाना वाचवण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्यामुळे फिंगरप्रिट नसल्याचं समोर आले. आरोपीना वाचवण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला. या प्रकरणातील सगळे तथ्य पुढे आणून, आरोपींवर कारवाई व्हावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. हायकोर्टाने हे प्रकरण सुमोटो घेतलं असल्याचेही ते म्हणाले.

शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत विचारले असता, जयंत पाटील यांचा मला फोन आला होता. उद्या (२१ जानेवारी) संध्याकाळी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. विधिमंडळ समितीवर निवड आणि इतर विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. ज्या काही वावड्या उठवल्या जात आहे, त्यावरही उद्याच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

नाशिकमध्ये मूकबधिर मुलावर अत्याचार झाला. यावर पटोले यांनी सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले, महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. पोलिसांचा धाक राहिला नाही. गुन्हेगारांना रान मोकळे झाले आहे. राज्याच्या मंत्रीमंडळातील ६५ टक्के मंत्री गुन्हेगारी प्रवृतीचे आहेत. त्यामुळे यांच्याकडून काय अपेक्षा करणार, असा सवालही पटोलेंनी केला.

Panchayat Samiti Election : भाजपच्या बंडखोराने घेतली काँग्रेसची मदत

राहुल शेवाळे यांनी केलेल्या दाव्याबद्दल बोलताना पटोले म्हणाले, बेईमानीने हे लोक निवडून आले. चोरी आणि डाका टाकण्याची मानसीकता त्यांची आहे. हे आमदार चोरणार, ते आमदार चोरणार, असे सांगतात. ह्यांची हीच मानसिकता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणारा हा महाराष्ट्र आहे. पण सत्तेत डाकू बसले आहेत, अशा घणाघाती टिका त्यांनी केली.

राहुल गांधी यांच्यावर भाजप खासदार अनिल बोंडे सातत्याने टीका करत असतात. याचा तीव्र शब्दांत नाना पटोलेंनी निषेध केला. ते म्हणाले कोणावर प्रतिक्रिया द्यावी अथवा नाही, हा विषय आहे. त्यामुळे त्यावर बोलणार नाही. ज्या माणसाची वैचारिक व्यवस्था बरोबर नाही. त्याच्यावर काय बोलणार, असा प्रश्न पटोले यांनी बोंडे यांचे नाव न घेता केला.

या सरकारमध्ये वाद किती आहेत, खाते वाटप करायला वेळ गेला. पालकमंत्री नियुत्यांमध्येही वाद झाला. एकीकडे मुख्यमंत्री 100 दिवसांत रिझल्ट द्यायचं म्हणतात. या सरकारमध्ये विवाद आहेत. एकीकडे मुख्यमंत्री दावोसला गेले असताना नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदांना स्थगिती द्यावी लागली. या सरकारमध्ये आलबेल नाही. हे सरकार कुठल्या उंबरठ्यावर उभे आहे? वाद विवाद की मलाईदार व्यवस्थेवर, हे यातून स्पष्ट होत असल्याचं नाना पटोले म्हणाले.