Gopinath Munde l would have been expelled Dhananjay munde from the district : नितीन देशमुखांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
Akola शिवसेना (ठाकरे गट) आमदार नितीन देशमुख यांनी अकोल्यातील जनआक्रोश मोर्चादरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. “स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हयात असते, तर धनंजय मुंडे यांना केवळ घरातूनच नव्हे, तर जिल्ह्यातूनही लाथ मारून हाकलले असते,” असे देशमुख म्हणाले.
नितीन देशमुख यांनी आरोप केला की, धनंजय मुंडे मंत्रीपदावर राहिल्यास वाल्मीक कराड यांना फायदा होईल. वाल्मीक कराड यांचा संबंध धनंजय मुंडेंशी आहे. त्यांनी स्वतः या घटनेनंतर राजीनामा द्यायला हवा. देशमुख म्हणाले की, धनंजय मुंडे महाभारतातील कर्णाप्रमाणेच आपल्या मित्राची साथ देतील, हे निश्चित आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संशयाचे वातावरण तयार झाले आहे.
सध्या महाराष्ट्रात संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण यावरून संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणांविरोधात विविध ठिकाणी जनआक्रोश मोर्चे काढले जात आहेत. मोर्चात सहभागी नेत्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीवरही भर दिला जात आहे.
धनंजय मुंडेंची भूमिका
धनंजय मुंडे यांनी वाल्मीक कराड यांच्यासोबत आर्थिक हितसंबंध असल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या शिबिरात त्यांनी या आरोपांना खोटे ठरवले.
Aditya Thackeray : मुख्यमंत्री दावोसला गेले, पण उपमुख्यमंत्री नाराज होऊन गेले कुठे ?
प्रकाश सोळंके यांचा आरोप
ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत: “वाल्मीक कराड धनंजय मुंडेंमुळेच मोठा झाला आहे,” असं ते म्हणाले. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद सातत्याने धनंजय मुंडेंकडे राहिल्यामुळे जिल्ह्याची स्थिती बिघडली, असं ते म्हणाले. “वाल्मीकला पोसणारे धनंजय मुंडे आहेत,” असे सोळंके यांनी स्पष्ट केले.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आणि आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, मुंडेंच्या राजकीय भवितव्याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.