The Indian constitution reached in twelve countries : समता फाउंडेशनचा उपक्रम; पुढील दोन वर्षांत पाच लाखांचे उद्दिष्ट
समता सैनिक दलाने दीक्षाभूमी येथे २०१८ मध्ये संविधान घराघराब पोहोचविण्याचा ठराव पारित केला. युद्धपातळीवर ‘नो लाइज पब्लिकेशन’ च्या सहयोगाने पुस्तक तयार करण्याचे काम होती घेण्यात आले. २०१८ मध्येच हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. हिंदी, इंग्रजी आणि मराठीतील प्रती नाममात्र दरात घरोघरी पोहचविल्या जात आहे. भारताच नाही तर १२ देशांमध्येही ही पुस्तिका वितरित करण्यात आली.
भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण दोन वर्षे ११ महिने आणि १८ दिवस लागले. आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकृत करून २६ जानेवारी १९५० पासून अंमलबजावणी सुरू झाली. भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, संविधानाची मूल्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचावे यासाठी ‘घर घर संविधान’ हा उपक्रम राबविण्याची मागणी संविधान फाउंडेशन, समता सैनिक दल यांच्या माध्यमातून वेळोवेळी करण्यात येत होती.
Ladki Bahin Yojna : व्यक्ती एक, योजना अनेक… आता चालणार नाही!
भारतीय संविधान आकाराने मोठे असल्याने सोबत बाळगणे कठीण होते. हीच अडचण ओळखून समता सैनिक दलाने पुढाकार घेऊन सहज हाताळता येईल असे छोटे पुस्तक तयार केले. ‘हर घर संविधान, हर जेब संविधान’ या मोहिमेंतर्गत संविधान संस्कार प्रत्येक मनामनात रुजावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. समता सैनिक दलाने दीक्षाभूमी येथे २०१८ मध्ये संविधान घराघरात पोहोचविण्याचा ठराव पारित केला होता.
युद्धपातळीवर ‘नो लाइज पब्लिकेशन’ च्या सहयोगाने पुस्तक तयार करण्याचे काम होती घेण्यात आले.
uddhav balasaheb thackeray shivsena : शिवसेनेने घेतली संविधान रक्षणाची शपथ
२०१८ मध्येच हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. हिंदी, इंग्रजी आणि मराठीतील प्रती नाममात्र दरात घरोघरी पोहचविल्या जात आहे. भारताच नाही तर १२ देशांमध्येही ही पुस्तिका वितरित करण्यात आली. लोकशिक्षण डोळ्यापुढे ठेऊन सुरू झालेला हा उपक्रम गेल्या आठ वर्षांत साडेतीन लाख घरांपर्यंत पोहोचला. पुढील दोन वर्षांत ५ लाख घरांत संविधान पोहोचविण्याचा उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे समता सैनिक दलाकडून सांगण्यात आले.