Sustainable development of women through Bachatgat : पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला विश्वास
Yavatmal महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान अर्थात उमेदने महिलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार केला. उमेद तसेच विविध यंत्रणांद्वारे निर्माण केल्या गेलेल्या हजारो बचतगटांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महिलांचा शाश्वत विकास होत आहे. महिला उद्योजक म्हणून पुढे येत आहे, असा विश्वास पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने उमेद अभियानांतर्गत समता मैदानावर आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय समृद्धी मिनी सरस प्रदर्शन व विक्रीचे पालकमंत्र्यांच्याहस्ते आज उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी अतुल इंगळे, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सारंग आगरकर आदी उपस्थित होते.
Rahul Bondre : विस्तापितांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न तातडीने सोडवा
जिल्ह्यात उमेद अंतर्गत 2 लाख 56 हजारावर स्वयंसहायता समूह तयार झाले आहेत. 2 लाख 62 हजारावर कुटुंब या समुहांशी जोडल्या गेलेले आहेत. ही खरं तर आनंदाची गोष्ट आहे. जितक्या जास्त महिला गटांशी जोडल्या जातील, तितके कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे. गेल्या काही वर्षात गटांनी अनेक नवीन प्रयोग केले. अनेक गटांचे उद्योजक होण्याचे स्वप्न उमेद अभियानामुळे साकार झाले, असेही पालकमंत्री म्हणाले.
जिल्ह्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजना, खनिज विकास योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. प्रभाग संघ, ग्रामसंघांना आपण सक्षम करतो आहे. गटाच्या महिलांना वेगळे नाविण्यपुर्ण उपक्रम करण्याच्या कल्पना असतील तर सांगा त्यासाठी देखील निधी उपलब्ध करून देऊ. जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे 24 महिला शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या आहे. ही देखील जिल्ह्यासाठी आनंदाची बाब असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.