Registration of only nine thousand farmers for purchase of soybeans : सोयाबीन खरेदीसाठी फक्त नऊ हजार शेतकऱ्यांची नोंदणी
Wardha सोयाबीनला ४ हजार ८९५ रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करण्याची हमी देण्यात आली होती. यासाठी जिल्ह्यातील ९ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली. आठ खरेदी केंद्रांवरून ७ हजार ८१८ शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करण्यात आली. हमी केंद्रांवर सोयाबीन खरेदीसाठी ६ फेब्रुवारी ही अखेरची तारीख होती. मात्र, खरेदीसाठी दिलेली मुदत संपल्याने दीड हजाराच्या घरातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पडून आहे. त्यामुळे त्यांना आता नाइलाजास्तव खासगी व्यापाऱ्यांना विकावे लागणार आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात चार लाख हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. त्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून सोयाबीनची लागवड केली होती. सुरुवातीला अल्प पाऊस, तर त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. काढणीला आलेल्या सोयाबीनला परतीच्या पावसाचा फटका बसला. दिवाळीपूर्वी हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र ऑक्टोबर महिन्यात सुरू करणार अशी शासनाच्या वतीने घोषणा करण्यात आली होती.
Collector of Nagpur to investors : तुम्ही तयारी करा, आठ दिवसांत मंजुरी देतो!
मात्र, प्रत्यक्षात नाफेड सोयाबीन खरेदीला उशीर झाला. त्या आठपैकी केवळ सुरुवातीला दोनच केंद्रांवरून खरेदीला मान्यता मिळाल्याने अनेकांना पडलेल्या दरात सोयाबीन खासगी व्यापाऱ्यांना विकावे लागले. आता मुदत संपल्याने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसमोरही खासगीचाच पर्याय शिल्लक राहिला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात नोंदणी केलेल्या ९ हजार १२ शेतकऱ्यांपैकी ७ हजार ८१८ शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी केले आहे. तर १ हजार ३७८ शेतकरी अद्याप बाकी आहेत.
सध्या खासगी बाजारात गुणवत्तापूर्ण सोयाबीन ४ हजार ते ४ हजार १०० रुपयांदरम्यान विकले जात आहे. तर ओला आणि कचरा असलेल्या सोयाबीनला केवळ ३ हजार १०० ते ३ हजार ४०० रुपयांपासून भाव पाडून खरेदी केला जात आहे. यात शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल दीड ते पावणे दोन हजार रुपयांचा घाटा सोसावा लागत आहे.
Guardian Secretary Urban Development Department : नागरिकांना अधिकाधिक सेवा ऑनलाइन द्या
दाताने तपासतात ओलावा
डिजिटलायझेशनचे वारे देशभरात वाहत आहे. यात शेतकरीही सुटला नाही. मात्र, शेतमाल विक्रीसाठी बाजारात घेऊन गेले असता अडते, व्यापारी अजूनही दातानेच ओलाव्याची तपासणी करून वाट्टेल तो दर ठरवीत असल्याचे चित्र स्थानिक एपीएमसीत पाहायला मिळाले.