Breaking

Farmer Suicide : गोंदियात गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या!

A farmer committed suicide by hanging himself in Gondia : कर्जबाजारीपणाला कंटाळून घेतला निर्णय

Gondia गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गोरेगाव तालुक्यातील मोहगाव बुद्रुक येथील 45 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली. सोमवार, दि. १० फेब्रुवारीला ही घटना उघडकीस आली. देवेंद्र भजनलाल पटले असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते कर्जबाजारीपणाला कंटाळले होते असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

शेतकऱ्याने घरातील आळ्याला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज, दि. 10 फेब्रुवारीला सकाळी 8:30 वाजता उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसार मोहगाव बुद्रुक येथील 45 वर्षीय शेतकरी देवेंद्र पटले 9 फेब्रुवारी दुपारी 12 पासून कुणालाही न सांगता घरातून निघून गेले होते.

District Central Co-operative Bank : आजोबांच्या बँकेत आता नातू झाला संचालक!

कुटुंबीयांनी त्यांचा रविवारी दिवसभर शोध घेतला. रात्रीपण शोध मोहीम सुरू होती. मात्र मृतक देवेंद्रचा कुठेही शोध लागला नाही. यातच आज सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास देवेंद्रचा मृतदेह शेजारच्या रिकाम्या घरात आढळला. शेजारी असलेल्या रिकाम्या घरातील आळ्याला गळफास लावल्याच्या स्थितीत आढळला.

देवेंद्रवर बँकेचे कर्ज होते असे सांगण्यात येत आहे. त्या कर्जाला कंटाळूनच देवेंद्रने आत्महत्या केली असावी अशी चर्चा आहे. देवेंद्र यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. देवेंद्र यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Crime in Hinganghat : इंस्टाग्रामवर पोस्ट केली; थेट खूनच केला!

साठ दिवसांत २०० आत्महत्या
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण असताना साठ दिवसांत २०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर या आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना होतील, असे वाटले होते. मात्र दुर्दैवाने अद्याप तरी शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे सरकारचे लक्ष गेलेले नाही. विरोधीपक्षातील नेते मंडळी सातत्याने संपूर्ण कर्जमाफीची मागणी करीत आहेत.