Admission of 1290 students confirmed in RTE : महिन्या अखेरपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार
Wardha आरटीईअंतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्रात मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी लॉटरी पद्धतीतून १ हजार २९० विद्यार्थ्यांची निवड झाली. २८ फेब्रुवारीपर्यंत संबंधित शाळेत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
आर्थिक दुर्बल घटकांसह मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला जातो. यासाठी १४ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्ह्यातील ११४ शाळेत १२९० जागांसाठी ४४७८ प्रवेश अर्ज आरटीईच्या संकेतस्थळावर दाखल झाले होते. पुणे येथे राज्यस्तरीय लॉटरी काढण्यात आली असून, यामध्ये जिल्ह्यातील १२९० विद्यार्थ्यांची निवड झाली. तर १२९८ विद्यार्थी वेटिंग वर आहे. १४ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत संबंधित शाळेत प्रवेश घ्यावा लागणार आहे.
Right to Education : १ हजार २९१ विद्यार्थी ठरतील आरटीईचे लाभार्थी!
प्रवेश घेताना आवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागणार आहे. प्रवेश घेताना काही अडचण आली, तर संबंधित पालकांना पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधता येणार आहे. मोफत प्रवेशासाठी लॉटरी पद्धतीने निवड झाल्यानंतर, पालकांच्या मोबाइल क्रमांकावर मेसेज पाठविण्यात आले.
पालकांनी केवळ मेसेजवर विसंबून न राहता आरटीई संकेतस्थळावरील सूचना वाचून सतर्क राहावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले. आरटीईअंतर्गत सर्वाधिक ४३ शाळा वर्धा तालुक्यातील आहेत. यंदा जिल्ह्यातील ११४ शाळांतील १२९० जागांसाठी ४४७८ प्रवेश अर्ज प्राप्त झाले आहेत.
Right to Education : आरटीईमध्ये ५८ जागा वाढल्या, शंभर शाळांची नोंदणी
जिल्ह्यात आरटीई अंतर्गत १७३ शाळा असून त्यापैकी ११४ शाळेने नोंदणी केली होती. १२९० जागा राखीव आहेत. मोफत प्रवेशासाठी रहिवासी पुरावा, रेशन कार्ड, मागास प्रवर्ग असेल, तर जातीचे प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, जन्म दाखला, ओळखीचा पुरावा, आधार कार्ड.
आरटीईच्या कक्षेत स्वयंअर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के राखीव जागा असतात. या राखीव जागेवर मोफत प्रवेश मिळणार असल्याने आरटीईकडे ओढा वाढत आहे. मोफत प्रवेशासाठी मुलाचा जन्माचा दाखला (बर्थ सर्टिफिकेट) अनिवार्य आहे. जन्माचा दाखला सादर न केल्यास, प्रवेश रद्द होऊ शकतो.
CM Devendra Fadnavis 100 days program : जिल्हा परिषदेचे अधिकारी एसीतून बाहेर निघाले
आरटीई अंतर्गत लॉटरी पद्धतीने पुणे येथे लॉटरी काढण्यात आली असून, जिल्ह्यातील १२९० बालकांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली. संबंधित शाळेत जाऊन पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. नंबर लागला अथवा नाही आरटीई पोर्टलवर पालकांना पाहता येणार आहे, तर शाळांनीही प्रवेशासाठी नंबर लागलेल्या पालकांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.