Breaking

Ravikant Tupkar : अरबी समुद्रात शेतकऱ्यांचा सातबारा बुडवणार!

 

Farmers will be declared debt-free : शेतकरी कर्जमुक्त झाल्याची घाेषणा करणार, रविकांत तुपकर आक्रमक

Buldhana शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, पिकविमा, सोयाबीनचा -कापसाचा भावफरक यासह सोयाबीन- कापूस, ऊस, कांदा, धान, दूध उत्पादकाना मदत व भाववाढ आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी शेतकरी 19 मार्च रोजी मुंबईत धडक देणार आहेत. रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात अरबी समुद्रात सातबारे बुडवून शेतकरी कर्जमुक्त झाल्याची घोषणा करणार आहेत.

सोयाबीन, कापूस बुडवून शासनाचे लक्ष वेधण्याची तयारी तुपकांनी केली आहे. या आंदोलनाची तयारी करण्यात येत आहे. गावागावातील शेतकरी मुंबईला जाण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. 18 मार्च रोजी सकाळी 9 वाजता बुलडाणा शहरातील क्रांतिकारी हेल्पलाइन सेंटर वरून रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात सर्व शेतकरी मुंबईकडे आगेकूच करणार आहेत.

State Budget : संत्रा प्रकल्पाच्या घोषणांचा निव्वळ ‘ज्युस’!

क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पुणे येथील ३ मार्चला झालेल्या बैठकीत रविकांत तुपकर यांनी 19 मार्च रोजी मुंबईत आंदोलनाचा बॉम्ब फोडणार असल्याची घोषणा केली होती. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतकऱ्यांच्या हक्काचा पिकविमा, सोयाबीन- कापूस भावफरक, नाफेड मध्ये अडकलेली शेतकऱ्यांची रक्कम, रखडलेले अनुदान, ऊसाला एकरकमी एफआरपी द्यावी या मागण्यांसाठी मुंबईत धडक देण्याचा इशारा दिला होता.

Ravikant Tupkar : सुडबुध्दीच्या राजकारणातून शेतकरी चळवळीवर आघात ?

18 मार्चपर्यंत त्यांनी सरकारला वेळ दिला होता. परंतु अद्याप सरकारकडून कोणताच सकारात्मक प्रतिसाद नसल्याने रविकांत तुपकर यांनी आंदोलनाची ठाम भूमिका घेतली आहे. 19 मार्च रोजी मुंबईतील नरिमन पॉईंट येथे अरबी समुद्रात आपले सातबारे बुडवून शेतकरी स्वतःला कर्जमुक्त झाल्याचे घोषित करणार आहेत तसेच सोयाबीन आणि कापूस समुद्रात बुडवून शासनाचे लक्ष वेधणार आहेत.

Ravikant Tupkar : शेतकऱ्यांसाठी सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार

 

या आंदोलनासाठी गावागावातून शेतकरी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची शक्यता आहे . 18 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता बुलढाणा येथील क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या हेल्पलाइन सेंटर समोर सगळे शेतकरी एकत्र जमणार आहेत व तेथून रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मुंबईकडे आगेकूच करणार आहेत. रात्री मुंबईच्या वेशीवर मुक्काम करून 19 मार्च रोजी सकाळी रविकांत तूपकरांचे नेतृत्वात सगळे शेतकरी नरिमन पॉईंट येथे अरबी समुद्रावर पोहोचणार आहेत.