Residence certificate providers are residents of another village : पोलिस पाटलांबाबत धक्कादायक खुलासा, इतरत्र झाले स्थायिक
Amravati पोलिस पाटील हे गावाच्या प्रशासकीय व पोलिस यंत्रणेसाठी अत्यंत महत्त्वाचे पद आहे. त्यांना गावातच राहणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र अमरावती जिल्ह्यातील अचलपूर उपविभागातील अनेक पोलिस पाटील हे स्वतःच्या गावाऐवजी तालुक्याबाहेर किंवा इतर जिल्ह्यांमध्ये स्थायिक झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. काही प्रकरणांमध्ये महिला पोलिस पाटलांनी लग्नानंतर पतीच्या घरी राहायला गेले तरी पदाचा राजीनामा दिलेला नाही.
महाराष्ट्र पोलिस पाटील अधिनियम १९६७ नुसार, पोलिस पाटलांना स्थानिक शेती किंवा व्यवसाय करता येतो. पण पूर्णवेळ व्यवसाय किंवा गावी न राहता इतरत्र स्थायिक होणे बेकायदेशीर आहे. तथापि, काही पोलिस पाटील हे बाहेरगावी राहूनही शासनाचे मानधन घेत आहेत. तसेच त्यांच्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे गावातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे.
National Food Security Scheme : रेशन कार्ड आहे? मग e-KYC करा, अन्यथा…
अचलपूर उपविभागात एकूण २२८ पोलिस पाटील पदे आहेत, त्यापैकी ६३ पदे रिक्त आहेत. कार्यरत असलेल्यांपैकी अनेकजण गावात वास्तव्यास नसल्याने शासनाची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक होत आहे. अमरावती जिल्हा पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष राहुल उके यांनी स्पष्ट केले की, नियमभंग करणाऱ्या पोलिस पाटलांवर कारवाईसाठी पाठपुरावा सुरू आहे.
Chandrashekhar Bawankule : पाणी टंचाईची ओरड नको, ठरलेल्या वेळेत कामे करा!
शासनाने मानधन लाटणाऱ्या आणि कर्तव्य विसरलेल्या पोलिस पाटलांकडून रक्कम वसूल करावी आणि रिक्त पदांची भरती प्रक्रिया लवकरात लवकर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. गावात शांतता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिस पाटलांवर असते. पण जेव्हा तेच गाव सोडून बाहेर स्थायिक होतात. तेव्हा त्यांच्या अनुपस्थितीत गावातील सुरक्षितता धोक्यात येते. त्यामुळे या बेकायदेशीर प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.