Breaking

Archaeological Department : भोन येथील बौद्ध स्तुपाच्या संवर्धन कार्याला गती

Land aquisition for Buddhist Stupa at Bhon in two months : दोन महिन्यांत जमीन अधिग्रहण; राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा

Khamgao बुलढाणा जिल्ह्याला पर्यटनाच्या नकाशावर नवी ओळख देणाऱ्या भोन येथील 2300 वर्षे जुने सम्राट अशोककालीन बौद्ध स्तुपाला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे. या पुरातन स्मारकाच्या संवर्धनासाठी जमीन अधिग्रहणाचे काम दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे.

राज्य शासनाने 3 सप्टेंबर 2024 रोजी याबाबतचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयामुळे भोन गाव आणि त्याचा परिसर पर्यटनासाठी जागतिक स्तरावर ओळखला जाईल. 2002 ते 2007 साला दरम्यान पुणे येथील डेक्कन महाविद्यालयाचे डॉ. भास्कर देवतारे यांच्या नेतृत्वात उत्खनन झाले. यात सापडलेल्या भोन येथील 2300 वर्ष जुन्या सम्राट अशोककालीन बौद्ध स्तूप स्थळाला संरक्षण देण्यात येणार आहे.

Chandrashekhar Bawankule : पाच वर्षात नागपूरला आंतरराष्ट्रीय शहर बनवणार !

त्यासाठी भोन परिसराला संरक्षक भिंत बांधून संरक्षित करणे गरजेचे आहे. त्यासाठी 2027 पर्यंत पहिल्या टप्प्यातील पाणी अडवण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचं जिगाव पुनर्वसन विभाग कार्यकारी अभियंता तुषार मेतकर यांनी सांगितलं आहे. ज्यातून 736.57 पैकी 180 दलघमी पाणी पहिल्या टप्प्यात साठवल्या जाणार आहे. भोन येथील गावाचे पुनर्वसन करण्यासाठी जमीन अधिकरणाचे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

भोन येथे पाण्याच्या मधोमध बेटासारखे जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र उभारले जाणार आहे. यामध्ये बोट क्लब, जागतिक दर्जाचे संग्रहालय, ध्यान केंद्र, मनोरंजन पार्क यांचा समावेश असेल. याशिवाय शेगाव येथील गजानन महाराज मंदिर आणि अंबाबरवा येथील व्याघ्र सफारीमुळे पर्यटकांना विविध निसर्ग पर्यटनाचा आनंद घेता येईल.

Vidarbha Farmers : कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको !

भारतीय स्तूप लेणी संवर्धन समितीच्या वतीने कार्यकारी अभियंता तुषार मेतकर यांचा सत्कार करण्यात आला. समितीने भोन येथील पुरातन वास्तूंचे जतन आणि संवर्धनासाठी शासन स्तरावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. भोनच्या विकासामुळे बुलढाणा जिल्ह्याला पर्यटन, शेती, आणि पाणीपुरवठा क्षेत्रात नवी दिशा मिळणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल