Breaking

CM Devendra Fadnavis : आम्ही भूमिपूजन केले, आम्हीच उद्घाटन करतोय!

 

Prime Minister Narendra Modi changed the ‘work culture’ : भाजप व मित्रपक्षांच्या कार्यप्रणालीवर स्तुतिसुमने

Nagpur देशातील बदललेल्या वर्क कल्चरवर भाष्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप व मित्रपक्षांच्या कार्यप्रणालीवर स्तुतिसुमने उधळली. अगोदर एक सरकार एखाद्या प्रकल्पाचे भूमिपूजन करायचे. दुसरे सरकार आले तरी ते काम अर्धवट राहायचे. तिसरे सरकार त्या कामाचे लोकार्पण करीत असे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे ‘वर्क कल्चर’ बदलवले. आता ज्या सरकारने भूमिपूजन केले तेच सरकार त्या प्रकल्पाचे उद्घाटन करीत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

23 Gram Panchayats disqualified 103 members : २३ ग्रामपंचायतींनी १०३ सदस्यांना केले अपात्र !

 

महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (महारेल) निर्मित नागपूर जिल्ह्यासह वर्धा, अमरावती, चंद्रपूर, धुळे, जळगाव आणि वाशिम या सात जिल्ह्यांतील सात रेल्वे उड्डाण पुलांचे एकाच वेळी त्यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

गेल्या १० वर्षांत राज्यात पायाभूत सुविधांची कामे अभूतपूर्व झाली आहेत. यामुळे नागपूरसह राज्याचा चेहरामोहरा बदलला आहे. सध्या देशात रस्ते, रेल्वे, मेट्रो, उड्डाणपूल आदी पायाभूत सुविधांची जी कामे सुरू आहेत. त्यात सर्वाधिक कामे महाराष्ट्रात सुरू आहेत. महारेलने राज्यात उड्डाणपूल बनवण्याचा एक नवीन रेकॉर्ड केला आहे. गतिशीलता काय असते, ते महारेलने दाखवून दिले आहे, असं फडणवीस म्हणाले.

Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशीचे कुटुंबीय आंबेडकरांच्या भेटीला !

पूर्वी १० वर्षांत २ पूल तयार व्हायचे. महारेलने एका वर्षात २५ पूल तयार केले आहेत. महारेलच्या माध्यमातून आणखी २०० पूल व अंडरपासची कामे करायची असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

फडणविसांचा ‘सुपर संडे’
देवेंद्र फडणवीस यांचा ५ जानेवारीला नागपुरात सुपर संडे होता. सकाळपासून सायंकाळपर्यंत ते विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते. यामध्ये महामेट्रो, महारेल, महारेरा, जैन समाज, हॉस्पिटलचे उद्घाटन आदी कार्यक्रमांमध्ये फडणविसांनी हजेरी लावली. एवढेच नव्हे तर प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.