Neelam Gorhe was in Uddhav Thackeray’s Group, so she knows it well : तीन लाख करोड रुपयांपेक्षा जास्त निधी शेतकऱ्यांच्या खात्यात चालला आहे
Nagpur : ‘उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये दोन मर्सीर्डीज कार दिल्या की, एक पद मिळतं’, असा घणाघाती आरोप विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे यांनी केलेला आहे. नीलम ताई त्या पक्षात होत्या. त्यामुळे त्या पक्षात काय चालतं, हे त्या सांगू शकतात. मी त्यावर काही कमेंट करणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नागपुरात आज (२४ फेब्रुवारी) मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारले असता, त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले. तीन लाख करोड रुपयांपेक्षा जास्त निधी शेतकऱ्यांच्या खात्यात चालला आहे. हा डीबीटीचा रेकॉर्ड आहे. धनंजय मुंडे यांचे डीपीटीच्या प्रकरणाबद्दल विचारले असता, कोणीही तक्रार केली, तरी आम्ही त्याची चौकशी करत असतो. तशा पद्धतीची चौकशी सुरू आहे. चौकशी झाल्यानंतर त्यावर मत व्यक्त करेन.
Devendra Fadanvis : ‘फिक्सर’ लोकांना अजिबात मान्यता देणार नाही !
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसाठी आठ तासांचा नियम लागू करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर घरगुती ग्राहकांसाठी पीएम सूर्यघर या योजनेसाठी आठ तासांचा नियम लागू नाही. या ठिकाणी जाणीवपूर्वक काही लोक चुकीची माहिती पसरवत आहेत. घरगुती सोलरधारक यात प्रभावी होणार नाहीत. याउलट आमच्याकडे तयार झालेली अतिरिक्त वीज काही उद्योग वापरणार असतील तर त्यातून पैसा मिळाला पाहिजे. यासाठी या दृष्टीने प्रपोजल तयार केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
साहित्य संमेलनात बोलताना प्रत्येकाने मर्यादा ठेवल्या पाहिजे. विशेषता जे साहित्यिक आहेत त्यांनी. साहित्यिकांना असं वाटत असेल राजकारणांनी येऊ नये, तर तशा पद्धतीचे वक्तव्य त्यांनीदेखील करू नये. पार्टी लाईनवरील ज्या कमेंट्स आहेत, त्या साहित्यिकांनी करणे योग्य नाही. त्यांनीही मर्यादा पाळल्या पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.