Revolutionary against the caste system : सेवाग्राम आश्रमात हुतात्मा दिन साजरा
Wardha गांधीजींच्या विचारांना समजावून घेणे आवश्यक आहे. त्यांचे विचारच नाही तर त्यांच्या जीवनातही मोकळेपणा होता. लहानपणापासून ते जातीपातीला मानत नव्हते. पण त्यांचे भाषण ऐकले तर मोठा विरोधाभास आपल्याला दिसून येईल. त्यामुळे बारकाईने पाहिले तर जातीय व्यवस्थेबाबत त्यांचे जीवनच क्रांतिकारक होते, असे मत डॉ. निशिकांत कोलगे यांनी व्यक्त केले.
महात्मा गांधी आश्रमात गांधीजींच्या ७७ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘जातीग्रस्त भारतातील गांधी’ प्रमुख व्यक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अभय बंग यांची उपस्थिती होती. आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने दोघांचेही खादी दुपट्टा देऊन स्वागत करण्यात आले.
Collector of Wardha : प्लास्टिक कचऱ्यासाठी सरसावले जिल्हाधिकारी!
कार्यक्रमाची सुरुवात आनंद निकेतनच्या विद्यार्थ्यांनी वैष्णव जन तो हे भजन आणि रघुपती राघव राजाराम ही धून गायनाने झाली. जमनालाल बजाज ग्रंथालय व संशोधन केंद्राचे संचालक डॉ सी. बी. के. जोसेफ व डॉ. बसवराज अक्की लिखित पुस्तकाचे हिंदीत भाषांतर करण्यात आले. या भाषांतरीत पुस्तकाचे यावेळी विमोचन केले. संचालन सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री विजय तांबे यांनी केले. याप्रसंगी सर्वोदय, गांधी विचार मानणारे, नयी तालीम समिती परिसरात सुरू असलेले युवा तालीम व राष्ट्रीय युवा संघटनेचे शिबिरार्थी उपस्थित होते.
गांधीजींचे जीवन व आचरण खूप काही सांगून जाते. गांधीजी लहानपणापासूनच जातीभेदाच्या विरोधात असल्याचे दिसून येते. देशाला एकजुटीची गरज असल्याने सर्व जातीधर्मांच्या लोकांना एकत्रित केले होते. त्यांना आपसात संघर्ष वा स्पर्धा नको होती. गांधीजींना बदल हवा होता. आज जातीचे राजकारण होताना दिसत आहे. राजकीय सत्ता आणि आर्थिक सत्ता ही युद्धाकडे नेणारी ठरू शकते. आधुनिक काळात जातीचा अंत हीच गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत डॉ. अभय बंग यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
ज्येष्ठ सर्वोदयी व ग्राम स्वराज्याचे कार्य करणारे अण्णा जाधव, मोहन हिराबाई हिरालाल व ॲड. मा. म. गडकरी यांचे नुकतेच निधन झाले, त्यामुळे कार्यक्रमादरम्यान या हुतात्मांना श्रद्धांजली वाहण्यात आली.