Breaking

A perverse psychiatrist in Nagpur : मानसोपचारतज्ज्ञाची आणखी प्रकरणं येताहेत पुढे !

More cases against psychiatrists may be registered in Nagpur : तक्रार करण्यासाठी महिला पुढे सरसावल्या

Nagpur एका मानसोपचारतज्ज्ञाने समपुदेशनाच्या नावाखाली महिलांचे लंगिक शोषण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली. या घटनेने नागपुरात खळबळ उडवून दिली. याची दखल राज्य पातळीवर घेण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेत तातडीने कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातील ही घटना आहे. त्यामुळे साऱ्यांचेच लक्ष वेधले गेले आहे. या विकृत मानसोपचारतज्ज्ञाच्या विरोधात आणखी तक्रारी पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शहरातील मानसोपचार तज्ज्ञाने शंभरावर मुली-महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात पीडितांची संख्या वाढत आहे. अजून काही मुली व महिलांनी पुढे येऊन तक्रारीची तयारी दाखवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता त्या विकृत मानसोपचार तज्ज्ञावर आणखी गुन्हे दाखल होणार आहेत. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने आणि गोपनीयता राखून तपास करीत आहेत. गेल्या दोनच दिवसांपूर्वी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

Wainganga-Nalganga River Linking Project : ‘या’ प्रकल्पाला ‘राष्ट्रीय प्रकल्प’ दर्जा मिळणार ?

आरोपी विकृत मानसोपचार तज्ज्ञ हा मानेवाडा परिसरात मानसोपचार केंद्र चालवत होता. त्याने सुरुवातीला अनेक पीडित महिलांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे त्याच्याकडे पीडित महिला व तरुणींसह अल्पवयीन मुलीची संख्या वाढली. गुरुवारी आणखी एका तरुणीने लेखी तक्रार दिल्याची माहिती समोर आली आहे.

विकृत मानसोपचार तज्ज्ञ गेल्या १३ वर्षांपासून उपचार करीत होता. त्याच्याकडे त्यावेळी अल्पवयीन असलेल्या मुलींचे आता लग्न झाले आहे. तसेच त्याच्याकडे काही अश्लील चित्रफितीसुद्धा होत्या. त्यामुळे पोलीसांत तक्रार केल्यास संसार विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही विवाहित महिला पुढे येण्यास धजावत नाहीत. मात्र, काही तरुणींना पोलिसांनी विश्वासात घेतले आहे. त्यांच्या नावाबाबत गोपनीयता ठेवण्याचे आश्वासन पोलीस देत आहेत. त्यामुळे काही तरुणी-महिला स्वत:हून समोर येत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Devendra Fadanvis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 ते 24 पुन्हा दावोसमध्ये

मदतनीस झाली बायको
विकृत मानसोपचार तज्ज्ञाच्या केंद्रात मानसोपचार अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारी एक तरुणी मदतनीस म्हणून काम करीत होती. त्याने तिलाही प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. मात्र, तो लग्न करण्यास टाळाटाळ करीत होता. त्यामुळे तिने पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याने आपल्या विद्यार्थिनीशी प्रेमविवाह केला होता. तीसुद्धा पतीच्या कुकृत्यात सहभागी होती. तसेच त्याची आणखी प्रेयसीसुद्धा त्याला सहकार्य करीत होती, अशी माहिती समोर आली आहे.